Close Visit Mhshetkari

ॲसिडीटी – योगासनांच्या मदतीने करा दूर | Hyper Acidity Problem

Hyper Acidity Problem : कोरोना काळात खाण्याच्या चुकीच्या सवयी,आरामदायी जीवनशैलीमुळे सध्या ॲसिडिटीचा त्रास होणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. ऍसिड रिफ्लेक्स म्हणून ओळखली जाणारे हे आम्लपित्त किंवा ॲसिडिटी पोटात जास्त ऍसिड तयार झाल्यामुळे होत असते.
योगासनांच्या मदतीने करा ॲसिडिटी दूर
 

ॲसिडीटी – योगासनांच्या मदतीने करा दूर

 

ॲसिडीटी – योगासनांच्या मदतीने दूर

पोटाच्या मागच्या बाजूस एसोफैगसमध्ये या ऍसिडचा प्रवाह वाहत असतो ज्याला ऍसिड रिफ्लेक्स असे म्हणतात. हे जास्त झालेले ऍसिड घशा जवळ येते. यामुळे गॅसेस,चिडचीड, जळजळ, पोटात दुखणं ही लक्षणं जाणवत असतात. खाण्याच्या चुकीच्या सवयी तसेच अन्न नीट चावून न खाणे,पुरेशी झोप न होने, पुरेसे पाणी न पिणे तसेच धुम्रपानामुळे ही ॲसीडिटी मध्ये वाढ होऊ शकते.

असिडीटी किंवा आम्लपित्त कमी करण्यासाठी अनेक औषधं बाजारात मिळत असतात,पण नैसर्गिक जीवनशैली ही आरोग्यासाठी उत्तम असते. जर काही योगासनं रोज केली तर असिडिटी त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.’ॲसिडीटी – योगासनांच्या मदतीने दूर’

योगासनांमुळे पोटात,आतड्यात रक्ताभिसरणात वाढ होऊन पचन सुधारत असते.आतड्यामधील हालचाल सुधारल्यामुळे वायुनिर्मिती होऊन पोटावरचा ताण कमी होतो आणि पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.

योगासनांच्या मदतीने करा ॲसिडिटी दूर

 1) कपालभाती प्राणायाम

कपालभाती
कपालभाती

कपालभाती प्राणायाम नियमित केल्याने पचनाचे अनेक विकार,पोटावरील चरबी आणि पोटाशी संबधीत अनेक विकारांच्या दूर होतात.

हे आसन करताना पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. डोळे मिटून गुडघ्यांवर तळहात ठेवा.

लयबद्ध श्‍वासोच्छ्वास करायची ही प्रक्रिया सरावाने जर 15 ते 20 मिनिटापर्यंत दररोज सुरू ठेवली तर ॲसिडिटीची समस्या कमी झाल्याचं तुम्हाला नक्की जाणवेल.

2) मार्जरी आसन

मार्जरी आसन
मार्जरी आसन

मार्जरी आसनमुळे रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत होते. पचन करणाऱ्या अवयवांचा व्यायाम होतो.उदर सुडौल होते. मन शांत बनते. पाठीच्या कण्याला लवचिकता आणते.

मार्जारासनामुळे मणक्यावरचा ताणही दूर होण्यास मदत होऊन शरीराला आराम मिळतो.

मार्जारासन करण्यासाठी हात आणि गुडघे जमिनीवर टेकवून मांजराप्रमाणे शरीर ठेवावे.

श्वास घेताना हनुवटी वर उचलून पाठीच्या कण्याची कमान करावी, थोडया वेळाने पाठ पूर्ववत करावी. अशी क्रिया दररोज सकाळी तीन ते पाच वेळा करावी.

3)पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासनपश्चिमोत्तानास

हे आसन ओटीपोटासाठी उत्तम असून पचन समस्यांना दूर करणे,पोटावरील चरबी कमी करणे यासाठी खूप मदत करते. जमिनीवर बसून पाय सरळ रेषेत ठेवा आणि हात बाजूला ठेवा.

पाठीचा कणा ताठ असल्याची खात्री केल्यावर पायाच्या अंगठ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

सुरूवातीला काही सेकंद या आसनाचा सराव केल्यावर एक ते तीन मिनिटापर्यंत या स्थितीत राहण्याची सवय लावा.शेवटी सावकाश मूळ स्थितीमध्ये परत या.अशा प्रकारे योगासनांच्या मदतीने करा ॲसिडिटी दूर

ॲसिडिटीवर घरघुती उपाय

  • ॲसिडिटीचा सतत होत असल्यास थंड दूध रात्री झोपताना पिल्याने पोटात आणि छातीत होणारी जळजळ कमी होते.
  • आल्याचा एक तुकडा चावून खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
  • केळ ॲसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय आहे. ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास नियमित केळ खाल्ल्याने त्रास कमी होतो.
  •  बडिशोप ॲसिडिटी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. जेवणानंतर बडिशोप खाल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.बडिशोप चावून खावी किंवा बडिशोप चा चहा करुनही पिऊ शकता.ॲसिडिटीवर घरघुती उपाय

Hyper Acidity Problem

मित्रांनो “Hyper Acidity Problem” हा लेख कसा वाटला कमेट्स द्वारे नक्की कळवा. आवडला असल्यास  व्यक्तींना नक्की शेअर करा.

सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ. कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment