HTBT Cotton कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भारत सरकार आता एचटीबीटी कॉटन उत्पादीत करण्यासाठी परवानगी देणार असल्याचे सांगितलं जातं आहे. यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे सांगितले जातं आहे.
या जातीच्या कापसाच्या उत्पादनाची चाचणी घेण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने नुकतेच स्पष्ट केले आहे. या जातीच्या कापसामुळे कापसाचे उत्पादन वाढत असेल आणि यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर या कापसाच्या उत्पादनास कुठलीच हरकत नसल्याचे सांगितलं जातं आहे.
HTBT Cotton variety |
एचटीबीटी कापूस बियाणे
हर्बीसाईड टॉलरंट बीटी (HTBT) कापूस बियाणे चाचणी घेण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी उशिरा परवानगी दिली आहे. देशातील काही राज्यांत यावर्षी ही चाचणी घेतली जाणार आहे.
सुमारे अडीच दशकांपूर्वी बीटी कॉटनचा देशात प्रवेश झाला होता. अल्पावधीतच या कापसाने देशातील कापूस बियाण्यांची अख्खी बाजारपेठ काबीज केली. देशातील 1 कोटी 10 लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र असलेले 95 ते 98 टक्के क्षेत्र BT कॉटनने व्यापले आहे. मात्र, सुरुवातीच्या बीजी-1 व बीजी-2 बियाणे निर्मितीनंतर शेतकऱ्यांचे तणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी एचटीबीटी चाचण्यांसाठी शेतकरी आग्रही होते.’एचटीबीटी कापूस बियाणे
HTBT वाणांची अवैध विक्री
मोन्सँटो या विदेशी कंपनीने नवीन एचटीबीटी बियाणे तयार केले.त्यानंतर सरकाकडे चाचण्यांसाठी परवानगी मागितली मात्र,त्याचवेळी केंद्र सरकारने मोन्सेंटोला केंद्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही.महाराष्ट्रामध्ये कापसाचे क्षेत्र जवळपास 43 लाख हेक्टरवर आहे.
यासाठी दरवर्षी 80 लाखांवर बीटी कॉटन बियाण्यांची पाकिटे लागतात. मात्र,HTBT चे 70 ते 75 लाख पाकिटे अवैध मार्गाने विकली जातात. यामुळे सरकारने ‘एचटीबीटी च्या चाचणीला परवानगी देऊन हा गुंता सोडवणे गरजेचे होते.तो आता दिलेल्या परवानगीमुळे सुटला आहे.
एचटीबीटी चाचणी घेण्यास परवानगी
मॉन्सन्टो कंपनी आता प्रमुख औषध निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाणारे बायर कंपनीने खरेदी केली आहे,मोन्सँटो ही कंपनी आता बायर कंपनीने विकत घेतली आहे.या कंपनीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून एचटीबीटी कापूस बियाणे चाचण्यांसाठी परवानगी मागितली केला.
केंद्र सरकारने बीजी-2 RRRF जनुकीय स्थानांतरित एचटीबीटी या वाणाला चाचणीसाठी परवानगी दिली आहे.कंपनीने bt3 कापसासाठी सरकारला आता पुन्हा एकदा प्रस्ताव पाठविला होता मात्र यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने यासंदर्भात अनुकूलता दर्शविली होती.
या पार्श्वभूमीवर गत फेब्रुवारी महिन्यात मुंबईत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एक बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी ‘एचटीबीटी’चाचणीला अनुकूलता दर्शवून त्यानंतर 5 मे रोजी उशिरा या खरीप हंगामात HTBT बियाण्यांची काही राज्यात चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे.
HTBT वाणांचे फायदे
दोन दशकांपूर्वी कापसाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 179 किलो एवढेच होते मात्र बीटी 1 कापसाची देशात इंट्री झाल्यानंतर कापसाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 400 किलो झाले. बीटी 2 कापसाची इंटर झाल्यानंतर हे सरासरी उत्पादन चारशे 450 किलो प्रति हेक्टर एवढे झाले. बीटी 3 कापूस क्षेत्र वाढल्यानंतर यामध्ये दुपटीने वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांद्वारे वर्तविला जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी एचटीबीटी कापसासाठी अनुकूल आहेत.
देशातील अनेक पर्यावरण प्रेमी या कापसाच्या उत्पादणामुळे पर्यावरणाचा व जैवविविधतेचा ऱ्हास होईल असा युक्तिवाद करत या कापसाच्या उत्पादनाला विरोध करत आहेत मात्र कापुस उत्पादक शेतकरी कापसासाठी अतिरिक्त मजूर लागते तसेच देशात प्रचंड मजूर टंचाई आहे तसेच कापसामध्ये मोठ्या प्रमाणात तन वाढत असते त्यामुळे कापसाचे मोठे नुकसान होते परिणामी कापसाच्या उत्पादनात घट बघायला मिळते,शिवाय उत्पादन खर्च देखील वाढतो त्यामुळे सरकारने एचटीबीटी कापसाच्या उत्पादनाला मान्यता द्यावी अशी मागणी करत आहेत.
HTBT Cotton Seeds
मित्रांनो वरीलही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.