Close Visit Mhshetkari

हर घर तिरंगा : तुमच्या घरावर झेंडा फडकावणार असाल,तर ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा Har Ghar Tiranga

Har Ghar Tiranga Campaign : हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. हर घर तिरंगा अभियान मराठी माहिती आपण जाणून घेऊयात.

Har Ghar Tiranga
Har Ghar Tiranga

Har Ghar Tiranga Information in Marathi

प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचे स्वतःचे प्रतीक किंवा चिन्ह असते.ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते. राष्ट्रध्वज हे प्रत्येक राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशातही राष्ट्रध्वज आहे, ज्याला तिरंगा म्हणतात.भारताचा राष्ट्रध्वज.तिरंगा हा भारताचा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी त्याचे खूप महत्त्व आहे.हर घर तिरंगा मोहीम कधी राबविण्यात येणार आहे?
हर घर तिरंगा मोहीम हे आपल्या संपूर्ण भारत देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. तसेच आपल्या संपूर्ण भारत देशातील नागरिकांना 2 ऑक्टोबर पासून सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटोला तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचे स्वतःचे प्रतीक किंवा चिन्ह असते.ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते. राष्ट्रध्वज हे प्रत्येक राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे.ज्याला तिरंगा म्हणतात.भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान आणि प्रत्येक भारतीयांसाठी त्याचे खूप महत्व आहे.या अभियाना अंतर्गत देशातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवला जाईल.

Har Ghar Tiranga Campaign

सर्व भारतीयांनी आपल्या अयुष्यात तिरंगा फडकवला असेलच, विशेषतः स्वातंत्र्यदिन आणी प्रजासताक दिना निमित, यावर्षी आपला देश भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे.
त्यानिमिताने यावेळी भारत सरकारतर्फे तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.
या अंतगर्त देशातील २० कोटींहून अधिक घरांमध्ये लोक सहभागातून तिरंगा फडकवला जाणार आहे. आमच्यासाठी तिरंगा हा खुप महत्वाचा आणि अभिमानाचा विषय आहे.हर घर तिरंगा मोहीम देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल.

हर घर तिरंगा मराठी घोषवाक्ये

1)चला घरोघरी तिरंगा फडकवुयात
स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव मोठया अभिमानाने,
हर्ष अणि उल्हासाने सर्व मिळुन साजरा करूया
2) तनी मनी बहरू देऊया नवा जोम होऊ देऊया
पुलकित तिरंगा हातातुन नभात लहरू देऊ उंच

4)आपल्या देशाचा तिरंगा हा वारयामुळे नव्हे तर ह्या देशातील शूर जवानांच्या धाडसामुळे शौर्यामुळे आज फडकतो आहे

5)तिरंगा आपला भारतीय ध्वज उंच उंच फडकावू

चला देशासाठी लढुन याची आणखी शान वाढवू

6) एकवेळ श्वास थांबेल पण देशप्रेमाचा मनातील भाव थांबणार नाही ,एकवेळ छातीवर बंदुकीची गोळी खाऊ पण आमच्या देशाचा तिरंगा झुकु देणार नाही.

7) नरेंद मोंदी यांची किमयाच न्यारी,फडकेल आता तिरंगा घरोघरी

बाजारात तिरंग्याला मोठी मागणी

संपूर्ण देशभरात तिरंग्याची मागणी वाढल्याची चित्र आहे. दिल्लीमधील सदर बाजारात लोकांची तिरंगा खरेदीसाठी झुंबड उडत आहे. “तिरंग्याची मागणी दहापटीने वाढली आहे. इतर छपाईची कामं कऱणारेही इतर कामं सोडून फक्त तिरंग्याची छपाई करत आहेत,” अशी माहिती दुकानदाराने एएनआयशी बोलताना दिली आहे.

हर घर तिरंगा’ अभियानात महाराष्ट्र अव्वल राहील;एकनाथ शिंदे यांची ग्वाही
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्य हे देशात अव्वल राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या बैठकीत दिली आहे.यावेळी स्वातंत्र्यदिनी देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.
या मोहिमेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवाहन करण्यात आले आहे.हर घर तिरंगा’ अभियानात महाराष्ट्र अव्वल राहील अशी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली आहे.

हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Tiranga Campaign)

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजासह सेल्फी पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी तिरंगा मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना यूजीसीकडून काढण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना harghartiranga.com या वेबसाईटवर तिरंग्यासह सेल्फी अपलोड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी तिरंगा भेट देऊ शकतील यूजीसीने विद्यापीठाला पाठवलेल्या सूचनांमध्ये स्वातंत्र्यादिनाच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्यास सांगितले असून त्यासोबतच महाविद्यालये पथनाट्य, प्रभातफेरी आणि सादरीकरणाच्या माध्यमातून अमृत महोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच तिरंगा खरेदी आणि भेटवस्तू देण्याची विशेष मोहीमही राबवू शकतील असंही त्यांनी सांगितले आहे.
पन्नास लाख झेंड्यांचे मोफत वाटप

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार,मुंबई महापालिका ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविणार आहे. त्यासाठी पालिका ७ कोटी रुपये खर्चून करणार आहे. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी पालिका प्रशासन, विविध क्षेत्रांमधील सामाजिक संस्थां, स्वयंसहाय्यता गट, बचत गट, स्वयंसेवक आदींच्या सहकार्याने झोपडपट्टीतील चाळी, वसाहती, मध्यम वर्गीय सोसायटी, उंच इमारती, पालिका, खासगी व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी पन्नास लाख झेंड्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

राष्ट्रध्वज फडकावताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात?

सरकारची ध्वजसंहिता याआधी अतिशय कडक होती. आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आली आहे. तरीही राष्ट्रध्वज फडकावताना खालील गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे.

1. ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा.

2. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये.

3. कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.

4. ध्वज फडकावताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.

5. ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये.

6. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.

7. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील.

8. राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा.

9. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन,अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.

10. जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.

तुमच्या घरी ध्वज फडकावण्याचा विचार करत असाल तर हे नियम नक्की लक्षात घ्यावेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत

हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत आयोजित कार्यक्रमांचे नियोजन

Har ghar tiranga campaign
Har ghar tiranga campaign

Leave a Comment