Group Insurance : सरकारनरी कर्मचारी वर्गास आनंदाची बातमी समोर आली असून दि.१ जानेवारी, २०२१ ते ३१ डिसेंबर, २०२१ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्याचे तक्ते निर्गमित करण्यात आलेले आहे.
Group Insurance for employees
वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना – १९८२ (Group Insurance for employees) अंतर्गत दिनांक १ जानेवारी,२०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर,२०२२ या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित केलेले आहेत.
सन २०२२ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या / आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित करणे आवश्यक होते.त्यानुसार २०२२ या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या / आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या परिगणितीय तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे,प्रति युनिटकरीता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात येणार आहे.
Gat vima navin gr
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक १ जानेवारी, २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ या कालावधीत राजीनामा / सेवानिवृत्त / सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना/ त्यांच्या वारसांना या सोबतच्या परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणार आहेत.
गट विमा योजना 2023
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून दरसाल दरशेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना- १९९० च्या विमा निधीमधील संचित रक्कमांवर दरसाल दर शेकडा ४ % या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.