Government employees : महाराष्ट्र राज्य सरकारने 10 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना4% महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञय करण्यात आला म्हणजे 38% दराने DA राज्य कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.शिवाय महागाई भत्ता थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
DA hike new updates
जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ अनुज्ञय केली असल्याने सहा महिन्याचा महागाई भत्ता थकबाकीचा लाभ देखील कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित आहे.
मात्र हा महागाई भत्ता थकबाकीचा लाभ जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना अजून पर्यंत मिळालेला नसुन अशा परिस्थितीत Dearness allowance Arrears हा फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या वेतनात दिली जाणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
बक्षी समिती अहवाल खंड 2
10 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत “बक्षी समिती अहवाल खंड 2” शिफारशी स्विकारल्या आहेत.परंतु या शिफारशी नेमक्या कोणत्या व सदरील शिफारशी स्विकृत झाल्याचा शासन निर्णय अजून काढला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकार विरोधात रोष वाढत आहे.
सरकारी कर्मचारी जाणार संपावर!
डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही असे स्पष्ट केले होते.
बक्षी समिती शिफारशी स्विकृत झाल्याचा शासन निर्णय न निघाणे,आता कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढला असून मार्चमध्ये संपावर जाणार असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार श्री. कुलथे सर यांनी सांगितले आहे.
Salary new update
शिक्षकांचे पगार रोटेशन पद्धतीने होत आहेत.कधी कधी शिक्षकांना दीड ते दोन महिने पगार होण्याची वाट बघावी लागत आहे.पण आता जानेवारी वेतन तरतूद प्राप्त झाली आहे.त्यामुळे माहे जानेवारीचे वेतन वेळेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.