GharkulGharkul yojana : महाराष्ट्राला यंदाच्या वर्षात चौदा लक्ष 26 हजार 14 घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात ते आले होते.यातील 91% म्हणजे 13 लाख 9 हजार घरकुलांना राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. एक लक्ष 16 हजार 955 घरकुलांना मंजुरी मिळणे बाकी होते.परिणामी ही घरकुले महाराष्ट्रातून इतर राज्यांत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना 2023
केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यासाठी मंजूर घरकुलांपैकी 1 लाख 17 हजार घरकुलेही इतर राज्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे यातही दप्तर दिरंगाईच कारणीभूत ठरणार आहे.कारण,गेल्या 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात मंजुरी न मिळालेली घरकुले इतर राज्यांना दिली जाणार असल्याचे सांगितले जाते आहे.
Gharkul yadi 2023
दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी याबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवले आहे.या मध्ये 31 डिसेंबरपर्यंत या घरकुलांना मंजुरी द्यावी,अथवा ती इतर राज्यांना दिली जातील,असे नमूद करण्यात आले होते.
अवघ्या चार दिवसांत ही प्रशासकीय प्रक्रिया शक्य नसल्याने आता “Gharkul yojana” घरकुलांचा कोटा इतर राज्यांसाठी दिला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंजूर घरकुले 3 महिन्यांत पूर्ण करावे लागणार!
ज्या घरकुलांना राज्य सरकारच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे त्या लाभार्थीना तत्काळ रकमेचा पहिला हप्ता वर्ग करण्यात यावा आणि येत्या ३१ मार्चअखेर सर्व मंजूर घरकुले पूर्ण करण्यात यावीत, अशाही सूचना आहेत. त्यामुळे या घरकुलांचे कामही तत्काळ पूर्ण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेला पेलावे लागणार आहे.