Close Visit Mhshetkari

Free ST Bus Service 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास, जनतेला दिलासा !

Free st bus Service : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासात 50% सवलत होती,मात्र आता हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.राज्य सरकारने काल तीन महत्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

free st bus service
free st bus service

एसटी बसचा मोफत प्रवास

वयोवृद्ध नागरिकांना दिलासा सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी राज्य सरकारने पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून वयोवृद्ध नागरिकांना दिलासा दिला आहे.ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी प्रशासनावर टाकली आहे. कोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, याबाबतचे धोरण लवकरच ठरवले जाईल,अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

Free ST Bus Service in Maharashtra

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे.

ST bus free service

सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ आज झाला. याप्रसंगी श्रीमती आनंदी गुरव, रमेश खाडे, विजय औंधे, बाबाजी चिपळूणकर, चंद्रमोहन परब यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत प्रवास सवलत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment