fertilizer subsidy : खतांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पोषण मूल्यावर आधारित खत अनुदानात वाढ केली.
![]() |
fertilizer subsidy |
रासायनिक खत अनूदान
केंद्र सरकारने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चालणाऱ्या खरीप हंगामासाठी 60,939 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली आहे. डीएपीसह पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खते सदरील अनुदानासाठी पात्र असतील.मागील वर्षी पोषण-आधारित खत अनुदानासाठी केवळ 57,150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.यावर्षी केंद्र सरकारने पोषक तत्वावर आधारित अनुदानात वाढ केली आहे.त्यामुळे ,DAP सह पोटॅश आणि फॉस्फेट खतांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत कायम राहतील, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.डीएपी खताच्या पिशवीचे अनुदान 512 रुपयांवरून 2501 रुपये करण्यात आले आहे. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आता डीएपीची एक पिशवी 1,350 रुपयांना खरेदी करू शकतील.(रासायनिक खत अनूदान)
fertilizer price today
जागतिक बाजारपेठेत विविध प्रकारच्या खतांची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे शेतकरी एवढी महागडी खते खरेदी करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपात अनुदान देते. जर एखाद्या शेतकऱ्याने बाजारात खुल्या भावाने खते घेतली तर त्याला विनाअनुदानित किमतीत खते मिळेल
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.