fertilizer management : कपाशी पीक घेत असताना शेत जमीनीच्या आरोग्याकड आधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठीच सदर लेखामध्ये कापसाचे योग्य खत व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत.
cotton fertilizer management |
Cotton Fertilizer dose
कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा (नत्र, स्फुरद, पलाश व गंधक) वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम इ. सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासते.
कपाशी खतांचा दुसरा डोस
लागवडीनंतर २३ ते ६० दिवसांत कपाशीला खताचा दुसरा डोस द्यावा
1) 10:26:26 (150 किलो) + 20(किलो युरिया) + बोरॉन,मॅग्नेशियम सल्फेट
किंवा
2) DAP (50 किलो) + (30 किलो) पोटॅश) + बोरॉन,मॅग्नेशियम सल्फेट
किंवा
3) 12:32:16 (75 किलो ) + बोरॉन, मॅग्नेशियम
किंवा
4) 20:20:0:13 (50 किलो) + पोटॅश (30 किलो) + बोरॉन,मॅग्नेशियम सल्फेट
किंवा
5) 9:24:24 / 8 21:21 (60 किलो) + बोरॉन,मॅग्नेशियम सल्फेट
किंवा
6) लागवडीपासून २५ दिवसांनी एकरी २५ किलो नत्र (कॅल्शियम अमोनियम नायट्रेटच्या स्वरूपात).
वरील पैकी कोणत्याही एका प्रकारचे कॉंबिनेशन्स वापरून खताचा दुसरा डोस द्यावा.
कापूस पिकासाठी विद्राव्य खत
कापूस पिकासाठी विद्राव्य खत
लागवडीनंतर २३ ते ६० दिवस
१२:६१:०० -२६.२२ किलो -०.७०८ किलो
युरिया -३४.२१ किलो–०.९२४ किलो
पांढरा पोटॅश – १३.१६ किलो – ०.३६१ किलो
डेपोखत : एक बैलगाडी शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळखताचा डेपो सावलीत करावा. यामध्ये ५ किलो झिंक सल्फेट, ५ किलो फेरस सल्फेट, ५ किलो मँगनीज सल्फेट, १ किलो बोरॉन टाकून डेपो एकवेळ खो-याने चांगला मिसळून घ्यावा.
त्यानंतर ५० लिटर पाण्यात १ किलो अझॅटोबॅक्टर, १ किलो ट्रायकोडर्मा व ५ किलो पीएसबी मिसळून हे द्रावण या डेपोवर शिंपडावे. परत एकदा हा डेपो चांगला मिसळून घ्यावा. हा डेपो सावलीत ७ दिवस ओलसर राहिल या पद्धतीने ठेवावा. कापूस लागवडीनंतर १८ ते २१ दिवसांदरम्यान पडणा-या पाळी बरोबर तो एक एकर क्षेत्रामध्ये जमिनीत मिसळावा.
Fertilizer management for cotton
- बोंडे चांगले पोसण्यासाठी 90 ते 120 दिवसांनी,द्रवखाद 20:20:00
- किंवा
- द्रवपोषक 13:00:45 ई.पाण्यात विरघळणाऱ्या खतांची 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
- मॅग्नेशिअम ची कमतरता असल्यास पेरणीपासुन 45 ते 75 दिवसांनी मॅग्नेशिअम सल्फेट ची फवारणी करावी.
- बोराॅन ची कमतरता असल्यास पेरणीपासुन 60 ते 90 दिवसांनी ( 1 ते 1.5 ग्रम प्रति लीटर पाण्यात)
- बोराॅनची ची फवारणी दर आठवड्यास करावी.