Close Visit Mhshetkari

Provident Fund : पीएफ खात्यातील रकमेतून गृह कर्जाची परतफेड करणे योग्य की अयोग्य ? पहा सोपे गणित .

Provident Fund : आपले स्वत:चे घर असावे ही सगळ्यांची इच्छा असते.आपण आपल्या आयुष्याची कमाई खर्च करतो. जवळपास बरेच जण घरासाठी कर्ज काढतो. यासाठी अनेक बँकांनी होम लोनची सुविधा दिली आहे.

मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, गृह कर्जाचा कालावधी खूप मोठा असतो. सदरील कर्ज कमी करण्यासाठी अनेकजण आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढून ते कर्जामध्ये भरत असतात.आज आपण कर्ज फेडण्यासाठी पीएफमधील पैसे काढणे बरोबर की चुक याचे गणित पाहणार आहोत.

PF Amount and Home Loan

EPF ही सर्वसाधारणपणे सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजनांपैकी एक योजना आहे.परंतु,आपल्या गृहकर्जाचा व्याजदर EPF वर उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा जास्त असेल, तर आपण ही रक्कम कर्जाच्या पूर्व पेमेंट साठी वापरले योग्य होऊ शकते.

उदाहरणार्थ, सध्या EPF वर ८.२५ % व्याजदर आहे. त्याच वेळी, बहुतेक बँका ८.५ ते १० % दराने गृहकर्ज देत आहेत. जर तुमच्या गृहकर्जाचा दर ९ % किंवा त्याहून अधिक असेल, तरच तुम्ही EPF रकमेतून गृहकर्जाच्या प्री-पेमेंटचा पर्याय विचार करावा.

हे पण पहा --  PF Account Balance : आपले पीएफ बॅलेन्स दोन मिनिटात मोबाईल वर चेक करा

आपण जर तरुण असाल आणि करिअरच्या सुरुवातीलाच आपण ईपीएफ चे पैसे कर्ज फेडण्यासाठी वापरले तर आपल्याला फायदा होईल कारण सेवानिवृत्तीसाठी पुन्हा आपल्या पीएफ खात्यात रक्कम जमा होऊ शकते.

EPFO होम लोनची परतफेड करण्यासाठी जमा केलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त ९० % रक्कम काढण्याची परवानगी देत, परंतु यासाठी कर्मचाऱ्यांना सेवेची 10 वर्षे पूर्ण झालेली असावी.गृहकर्ज परतफेड योजनेअंतर्गत,EPFO सदस्य त्यांच्या खात्यातून EMI भरू शकतात.

पीएफ हा कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा आणि अन्यसाधारण घटक असतो.त्यामुळे पीएफ खात्यातून पैसे काढण्यापूर्वी एकदा विचार करावा. शेवटचा पर्याय म्हणून पीएफ खात्यातील रक्कम काढणे योग्य ठरेल थोडक्यात आपल्या पीएफ खात्यातून रक्कम काढणे शक्यतोवर टाळले पाहिजे.सध्या यावर ८.२५ % व्याज आहे.

Leave a Comment