Government employees rule : सरकारी कर्मचारी शासकीय आल्यानंतर बिनधास्तपणे वावरत असतो परंतु अशा वेळेस महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वागण्यावर राहण्यावर आणि विविध कार्य शैलीवरच नियम बनवलेले आहेत या सर्व नियमांची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत ज्याच्या द्वारे नक्कीच आपल्याला आपल्या सरकारी नोकरी करत असताना फायदा होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम
राजकारण आणि निवडणुका मध्ये सहभाग
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला, कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही किंवा त्याच्याशी अन्यथा संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही किंवा त्यासाठी वर्गणी देता येणार नाही किंवा सहाय्य करता येणार नाही.
शासकीय कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूकीत प्रचार करू शकणार नाही किंवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही.
निदर्शने आणि संप
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षिततेला, विदेशी सरकारांशी
असणान्या मैत्रीच्या संबंधाना, सार्वत्रिक सुव्यवस्थेला सभ्यतेला किंवा नैतिक मूल्यांना बाधक ठरतील अशा किंवा ज्यामध्ये न्यायालयाचा अवमान केला जातो, मानहानी केली जाते किंवा गुन्हा करण्याला प्रोत्साहान मिळते, अशा कोणत्याही निदर्शनामध्ये स्वतःला गुंतवून घेता कामा नये किंवा त्यात भाग घेता कामा नये.
जर त्या त्या वेळी अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये असा संप करण्यास त्याला स्पष्टपणे परवानगी दिलेली असेल, अशा कोणत्याही संपात भाग घेण्यापासून, या उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होत असल्याचे मानले जाणार नाही.
Government employees rules 1979
शासकीय कर्मचाऱ्यांचा संघटनांमध्ये सहभाग
ज्या संघटनेची उद्दिष्टे किंवा कार्य भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला किंवा सुव्यवस्थेला किंवा नैतिक मूल्यांना बाधक असतात, अशा संघटनेत शासकीय कर्मचारी सहभागी होऊ शकणार नाही किंवा त्याचा सदस्य राहू शकणार नाही.
कार्यालयीन माहिती पुरविणे
प्रत्येक शासकीय कर्मचारी आपली कर्तव्ये सद्भावपूर्वक पार पाडीत असताना, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) आणि त्याखाली करण्यात आलेले नियम यानुसार एखाद्या व्यक्तीस माहिती देईल व त्याच्या तरतूदींनुसार सबंधित व्यक्तीला माहिती देऊ शकेल.
परंतु, कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशानुसार किंवा त्याच्यावर सोपविण्यात आलेली कर्तव्ये सद्भावपूर्वक पार पाडीत असेल, ते खेरीजकरून, कोणताही कार्यालयीन दस्तऐवज किंवा त्याचा कोणताही भाग किंवा वर्गीकृत माहिती देण्यास त्यास प्राधिकृत केले नसेल,अशा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस प्रत्यक्षपणे किंवा अप्रयक्षपणे देणार नाही.
वृत्तपत्रे किंवा आकाशवाणी किंवा दूरदर्शन संपर्क प्रतिबंध
शासकीय कर्मचारी,संपूर्णत: किंवा अंशतः स्वतःच्या मालकीचे कोणतेही वृत्तपत्र किंवा इतर नियतकालिक प्रकाशन चालवू शकणार नाही किंवा त्यांचे संपादन किंवा व्यवस्थापन करण्यात सहभागी होऊ शकणार नाही.
परंतु,शासनास कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला,ज्यामध्ये केवळ अराजकीय स्वरूपाच्या बाबी समाविष्ट असतात,असे वृत्तपत्र किंवा नियतकालिक प्रकाशन स्वतःच्या मालकीत ठेवण्यास किंवा चालविण्यास किंवा त्यांचे संपादन किंवा व्यवस्थापन करण्यात सहभागी होण्यास परवानगी देता येईल.
स्वतः किंवा प्रकाशकामार्फत पुस्तक प्रकाशित करू शकणार नाही, किंवा पुस्तकाला किंवा मजकुराच्या संकलनाकरिता मजकूर देऊ शकणार नाही.
स्वतःच्या नावाने किंवा निनावी किंवा टोपणनावाने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावाने.आकाशवाणीवरील ध्वनिक्षेपित भाषणात किंवा दूरदर्शनवरील प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही किंवा वृत्तपत्राला किंवा नियतकालिकाला लेख किंवा पत्र पाठवू शकणार नाही.
परंतू,जर असे प्रकाशन प्रकाशका मार्फत प्रकाशित केले जात असेल आणि ते केवळ साहित्यिक,कलात्मक किंवा वैज्ञानिक स्वरूपाचे असेल आणि असे लेखन,भाषण हे केवळ साहित्यिक,कलात्मक किंवा वैज्ञानिक स्वरूपाचे असेल, तर अशा मंजुरीची आवश्यकता असणार नाही.
महाराष्ट्र सरकारी कर्मचारी संहिता
समितीपुढे किंवा अन्य प्राधिकरणापुढे साक्ष
शासकीय कर्मचारी,शासनाच्या पूर्व मान्यतेखेरीज,कोणत्याही व्यक्तीने, समितीने किंवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या कोणत्याही चौकशीमध्ये साक्ष देऊ शकणार नाही.
शासकीय कर्मचारी,शासनाच्या संमतीने साक्ष देत असताना, शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या धोरणावर किंवा कोणत्याही कृतीवर टीका करू शकणार नाही.
अभिदान (वर्गणी)
शासकीय कर्मचारी, शासनाच्या किंवा विहित प्राधिकरणाच्या
पूर्व मंजुरीखेरीज, कोणत्याही उद्दिष्टाला अनुलक्षून रोख रकमेतील किंवा वस्तुच्या स्वरूपातील कोणताही निधी उभारण्यासाठी किंवा इतर वस्तू गोळा करण्यासाठी अंशदान (वर्गणी) मागू शकणार नाही किंवा देऊ शकणार नाही अन्यथा त्या कामात सहयोग देऊ शकणार नाही.
‘परंतु, नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, नवी दिल्ली यांच्याकडून ध्वजदिन निधी उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये जो कोणताही राज्य शासकीय कर्मचारी स्वेच्छेने सहभागी होईल, त्याला या नियमाच्या तरतुदी लागू असणार नाहीत.
देणग्या (गिफ्टस)
शासकीय कर्मचारी,कोणतीही देणगी स्वतः स्वीकारणार नाही किंवा त्याच्या कोणत्याही कुटुंबियाला किंवा त्याच्यावतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी स्वीकारण्यास परवानगी देणार नाही.
शासकीय कर्मचारी, त्याच्याशी कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा औद्योगिक किंवा वाणिज्यिक संस्थाकडून,संघटनाकडून किंवा तत्सम मंडळाकडून मुक्तहस्ताने केलेला पाहुणचार किंवा वारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारण्याचे टाळील.
Maharashtra government employees gr
शासकीय कर्मचारी व सार्वजनिक समारंभ
कोणताही शासकीय कर्मचारी,शासनाची पूर्वमंजुरी मिळाल्याखेरीज त्यांच्या संबंधातील किंवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचान्याच्या संबंधातील कोणत्याही गौरवपर भाषण समारंभास किंवा निरोप समारंभास मान्यता देणार नाही किंवा कोणतेही प्रशस्तिपत्र स्वीकारणार नाही.त्याच्यासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहणार नाही.
तसबीर काढून घेण्याकरिता एकाच ठिकाणी बसणे.
सरकारी कर्मचान्याला कोणत्याही सार्वजनिक संस्थेच्या विनंतीवरुन तयार करण्यात येणारी परंतु त्याला भेटीदाखल म्हणून देण्यात न येणारी, त्याची तसबीर, त्याचा अर्धपुतळा किंवा इतर प्रकारचा त्याचा पुतळा यांकरिता बसण्यास प्रतिबंध होणार नाही.
राजीनामा द्यावयास लावण्याबाबत
राज्य ज्ञकर्मचारी, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या हिताकरिता, शासनामधील कोणत्याही कार्यालयातील त्यांच्यापैकीच एक असलेल्या, एखाद्या व्यक्तीच्या राजीनाम्याकरिता पैशाविषयीच्या कोणत्याही व्यवस्थेत सहभागी होणार नाही
पैसे गुंतविणे, उसने देणे आणि उसने घेणे
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी कोणत्याही राख्यामध्ये, शेअरमध्ये किंवा इतर गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवणार नाही.
शेअर्स,कर्जरोख किंवा इतर गुंतवणूकी यांची वारंवार खरेदी करणे किंवा विक्री करणे किंवा दोन्ही बाबी करणे हे या पोट-नियमाच्या अर्थानुसार सट्टा असल्याचे मानण्यात येईल.
कोणताही शासकीय कर्मचारी, त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीला. ज्या गुंतवणुकीमुळे त्याचे कार्यालयीन काम पार पाडण्याबाबत अडचण येऊ शकेल किंवा दबाव येऊ शकल अशी कोणतीही गुंतवणूक करु देणार नाही किंवा करण्यास परवानगी देणार नाही.
कर्मचारी अधिकाराच्या स्थानिक कक्षांमधील किंवा त्याच्या कार्यालयीन कामकाजाशी जिचा संबंध येण्याचा संभव आहे, अन्यथा अशा किंवा अन्यथा ज्या व्यक्तीचे कोणतेही आर्थिक उपकार त्याच्यावर होणार असतील अशा कोणत्याही व्यक्तीला / कोणत्याही व्यक्तीकडून प्रकर्ता म्हणून किंवा एजंट म्हणून पैसे उसने देणार नाही / पैसे उसने घेणार नाही.
मादक पेयांचे अथवा मादक औषधिद्रव्यांचे सेवन
शासकीय कर्मचारी ज्या क्षेत्रात त्या त्या वेळी रहात असेल त्या क्षेत्रामध्ये अमलात असणाऱ्या मादक पेय किंवा मादक औषधिद्रव्ये यासंबंधीच्या कोणत्याही कायद्याचे कटाक्षाने पालन करील.
सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मादक पेय किंवा मादक औषधी द्रव्याचे सेवन करण्याचे टाळेल. नशा चढलेल्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी येणार नाही.कोणत्याही मादक पयाचे किंवा मादक औषधद्रव्याचे प्रमाणबाहेर सेवन करणार नाही.
विवाहविषयक करार
राज्य शासकीय कर्मचारी ज्याचा जीवनसाथी हयात आहे, अशा व्यक्तीशी विवाह करणार नाही किंवा विवाहविषयक करार करणार नाही.ज्याचा जीवनसाथी हयात आहे,असा कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही व्यक्तीशी विवाह करणार नाही, किंवा विवाहविषयक करार करणार नाही.
भारतीय नागरिक नसणाऱ्या व्यक्तीशी विवाह केलेल्या किंवा विवाह करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याबाबत शासनाला तत्काळ कळवले पाहिजे.
हुंड्यास प्रतिबंध
शासकीय कर्मचारी हुंडा घेऊ किंवा देऊ शकणार नाही किंवा घेण्यास किंवा देण्यास चिथावणी देऊ शकणार नाही.वधुकडील किंवा यथास्थिती, वराकडील मातापित्यांकडून किंवा पालकांकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही “हुंडा” मागणार नाही.
कामकरी महिलांच्या लैंगिक छळवादास प्रतिबंध.
कर्मचारी कोणत्याही महिलेच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवादाचे कोणतेही कृत्य करणार नाही.कामाच्या ठिकाणी प्रभारी असलेला प्रत्येक शासकीय कर्मचारी त्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही महिलेच्या लैंगिक छळवादास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करील.
अशासकीय व्यक्तीकडून दबाव
सरकारी कर्मचारी, त्याच्या शासकीय सेवेसंबंधीच्या कोणत्याही बाबीच्या संबंधात कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणावर कोणताही राजकीय किंवा इतर बाह्य दबाव आणणार नाही किंवा तसा प्रयत्न करणार नाही.
जातीय संस्थांचे सदस्यत्व
कर्मचारी ज्या कोणत्याही कृतीमुळे धार्मिक, जातीय, प्रादेशिक, वांशिक किंवा इतर कारणांवरून भारतातील विभिन्न जमातीमध्ये तिरस्काराची भावना किंवा द्वेषभावना चेतवली जात आणि निर्माण केली जाते अशा कोणत्याही कृतीमध्ये लेखी, भाषणाद्वारे किंवा कृतीद्वारे किंवा अन्यथा स्वतःस गुंतवून घेणार नाही.
स्थावर जंगम व मौल्यवान मालमत्ता
कोणत्याही सेवेत किंवा पदावर प्रथम नियुक्ती झाल्यानंतर, आणि त्यानंतर शासन विनिर्दिष्ट करील अशा कालांतराने, पुढील
गोष्टीसंबंधीचा संपूर्ण तपशील देणारे, शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील त्याच्या मत्तेचे व दायित्वाचे विवरण सादर करतील.
नातेवाईकांची कंपन्यामध्ये किंवा भागीदारी संस्थांमध्ये नियुक्ती
शासकीय कर्मचाऱ्याने, त्याच्या कुटुंबियाला कोणत्याही कंपनीत किवा भागीदारी संस्थेत नियुक्ती मिळविण्याकरिता त्याच्या पदाचा किंवा वशिल्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वापर करता कामा नये.
जेव्हा गट-अ किंवा गट-ब चा अधिकाऱ्यांना ही वस्तुस्थिती ज्ञात होईल की त्याच्या कुटुंबियांने कोणत्याही कंपनीत किंवा भागीदारी संस्थेत नोकरी स्वीकारली आहे, तेव्हा त्याने नोकरी स्वीकारल्याबद्दल शासनाला कळविले पाहिजे.