Close Visit Mhshetkari

Education news इयत्ता तिसरी ते आठवी साठी पुन्हा परिक्षा सुरू करणार

Education news : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना परीक्षाना समोरे जावे लागणार आहे.राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (RTE Act 2009) इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा माघील 10 वर्षांपासून सध्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित सातत्यपूर्ण सर्वंकष पद्धतीने मूल्यमापन केले जात होते.

तिसरी ते आठवीसाठी पुन्हा परिक्षा सरू होणार

विद्यार्थ्यांच्या दहा वर्षापासून बंद असलेल्या परीक्षा घेण्याची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत केली शिव संपर्क यात्रेच्या निमित्ताने दीपक केसरकर यांनी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले सरकार शिक्षण दर्जेदार व्हावेत यासाठी काम करीत आहे महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात नव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राला पहिल्या तीन क्रमांका मध्ये आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने राबविण्याचा विचार आहे.

कमी पटाच्या शाळा बंद नाही करणार

शून्य शिक्षकी आणि एका शिक्षकी शाळांचे एकत्रीकरण केले जाणार आहे शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न चिन्ह पूर्वी सोडविले जातील आणि त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल सरकारचे कमी पटसंख्या बंद करण्याचे धोरण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले
शिकवण्यावर मर्यादा येतात वेगवेगळ्या शिक्षकांना चांगल्या शाळा देऊ शकतो यासाठी धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे.मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यास नमुन्याचे पुस्तके तयार केली आहेत पुस्तकातच वही असणार आहे पुस्तकात सर्वच विषय असले तरी वजन कमी असणार आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे.

हे पण पहा --  Education policy : सरकारने राज्यातील शाळा संदर्भात घेतला मोठा निर्णय! आता अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ..

विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे बंद होणार नाही

सरकारने गृहपाठ बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेली नाही शिक्षणाच्या खेळखंडोबा होऊ नये म्हणून तज्ञांना विचारूनच सर्व निर्णय घेतली जातील गृहपाठ ज्युनिअर केजी सीनियर केजी ला दिले जाते हे त्यांचे खेळण्याचे वय असते लहान मुलांच्या डोक्याला इतर देशात ताण दिला जात नाही मुलांना आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने मुले अभ्यासात मागे पडत आहेत सायन्स गणित इंग्रजी या विषयांत विद्यार्थी कमी पडत आहे या विषयांबद्दल आवड निर्माण केली जाणार आहे यासाठी प्रयोग केले जात आहे.

लवकरच नवीन शिक्षक भरती

जेथे वाहन जात नाही अशा दुर्गम भागातील शाळांची माहिती घेतली जाईल सर्वांना शिक्षण मिळणे त्यांचा हक्क आहे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. शिक्षकांचा दर्जा चांगला आहे राज्य प्राथमिक शाळांमधील शिक्षणात अग्रेसर आहे माध्यमिक मध्ये कमी पडत आहोत प्राथमिक शिक्षणाचा पाया अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली आहे यासाठी एक कोटी लोकांची परीक्षा 30 हजार पदे रिक्त आहेत तत्काळ 15000 शिक्षकांची पदे भरली जाणार असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हणाले.

Leave a Comment