Close Visit Mhshetkari

डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाषण | Dr. Ambedkar speech in Marathi

Dr. Ambedkar speech : 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. १९९० मध्ये,त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला.आज आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मराठी आणि हिंदी भाषेतील भाषण पाहणार आहोत.

डॉ.आंबेडकर
डॉ.आंबेडकर

 

डॉ .बाबासाहेब आंबेडकर – मराठी भाषण

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते.भिमरावांना शालेय शिक्षण घेताना “अस्पृश्य’ म्हणून मानहानी स्विकारावी लागली.पण ते मुळीच खचले नाहीत,त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उध्दार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.

१९०८ मध्ये भिमराव यांचा विवाह रमाबाई यांच्या सोबत करुन दिला.रमाबाई गरीब घराण्याल्या होत्या.त्यांनी बाबासाहेबाच्या खांद्याला खांदा देवून त्यांच्या शिक्षणात मदत केली.रमाबाईंनी सोन्याचांदीची कधी आशा केली नाही.कपाळाचं कुंकू हेच ती आपला दागिना समजत असे.मित्रांनो आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या त्यांनीच घेतल्या आहेत.वकिल बनून गरीबांना न्याय मिळवून दिला.

गोर गरिब,दलित समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी चळवळ सूरु केली.शुद्रांना महाडच्या चवदार तळयाचे पाणी पाणी पिण्याची मनाई होती.परंतु बाबासाहेबानी आदोलन करुन सर्वांकरीता ते खुले केले. डॉ बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती” या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील काळाराम मंदिरामधे दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले.मुकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत है साप्ताहिक तर समता हे वृत्तपन्न सुरू करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहूमल्य कार्य केले.त्यांनी स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला.मित्रांनो या देशातील समता,स्वतंत्रता,एकता टिकून राहावी म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर
Dr.BR Ambedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यास मोलाचा वाटा उचलला होता.’शिका संघटित व्हा,संघर्ष करा’हा मोलाचा महामंत्र त्यांनी दिला.इ.स.१९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृति बिघडली व दिल्ली मध्ये ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेब हे जग सोडून कायमचे निघून गेले. त्यांच्या जाण्यामुळे सारे जग रडले.त्यांचे पार्थिव शरीर विशेष विमानाने मुंबईच्या दादर चौपाटीवर आणण्यात आले व अंतिम संस्कार बौद्ध रितीरिजानुसार करण्यात आले.तेव्हापासून त्या भूमिला चैत्यभूमी असे नाव देण्यात आले.महामानवाच्या अंत्य यात्रेमध्ये १० ते १२ लाख नागरिक शामील झाले होते व त्याची रांग लांबच लांब म्हणजे ३ मैलांची होती असे इतिहासात नमूद आहे

इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर – हिंदी भाषण (Dr.Babasaheb Ambedkar speech in Hindi)

डॉ.बाबा साहेब आंबेडकर अपने माता भिमाबाई और पिता रामजी की चौदहवीं संतान थे। डॉ आंबेडकर का जन्म 14 अप्रैल 1891 को  मध्य प्रदेश के इंदौर के पास महू में हुआ था। उनका जीवन काफी संघर्षमय था फिर भी वो दृढ़ संकल्प के साथ आगे बढ़ते गए। उनके जीवन में सबसे बड़ी बाधा उनकी जाती थी। वे एक अछूत,दलित परिवार से ताल्लुक रखते थे।

 

Dr.Babasaheb Ambedkar
Dr.Babasaheb Ambedkar

मैट्रिक की परीक्षा पास करने के बाद उन्होंने उन्होंने बॉम्बे विश्वविद्यालय से राजनीति विज्ञान और अर्थशास्त्र में स्नातक  किया। उनकी पिता की मृत्यु हो जाने के बाद उनके घर के हालात काफी ख़राब हो गए, फिर भी उन्होंने आगे पढाई के लिए विदेश जाने का फैसला किया। भीमराव आंबेडकर 1913 से 1917 तक और फिर 1920 से 1923 तक विदेश में रहे। उनके शोध के लिए  कोलंबिया विश्वविद्यालय द्वारा उन्हें पीएचडी से सम्मानित किया गया था।

डॉ.बाबासाहेब एक गहना थे। आज भी सभी के लिए एक प्रेरणा रूप है।आंबेडकर  विदेशी विश्वविद्यालय में आर्थिक डिग्री प्राप्त करने वाले पहले भारतीय थे। भारत रत्न बाबा साहेब आंबेडकर के पास 32 डिग्रियां थी और वो 9 भाषाओं के जानकार थे।डा.बाबासाहेब एक दूरदर्शी व्यक्ति थे। उन्होंने भारत की जल और बिजली नीति के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई । 14 अक्टूबर 1956 को 5 लाख लोगों के साथ नागपुर में उन्होंने बौद्ध धर्म की दीक्षा ली।

भारतीय संविधान के निर्माण में भी अपना अहम योगदान दिया। भारत के संविधान को आकार देने के लिए डॉ.भीमराव अम्बेडकर का योगदान महत्वपूर्ण है । उन्होंने एक ऐसे संविधान की रचना की,जो अपने देश को निष्पक्ष और प्रगतिशील बनाएं। भारतीय संविधान के जनक का 6 दिसंबर 1956 को निधन हो गया।

डॉ.आंबेडकर

मित्रांनो “डॉ.आंबेडकर” संबधीत माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment