Close Visit Mhshetkari

Diwali Festival : यावर्षी कधी आहे दिवाळी? पहा शुभमुहूर्त,विधी,पुजन आणि आख्यायिका सर्व माहिती

Diwali Festival : दिवाळी (5 days of diwali) हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे.हिंदू पंचांगानुसार,दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो.दिवाळी हा सण आनंद,समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.दिवाळीच्या सणाला लक्ष्मीजीची विशेष पूजा केली जाते.

5 days of diwali

दिवाळी किंवा दीपावली हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे.हिंदू धर्मात दिवाळीचे विशेष महत्व आहे.धनतेरस पासून भाऊ बीज पर्यंत जवळ जवळ 5 दिवसापर्यंत चालणारा दिवाळी हा सण भारत आणि नेपाळ सोबत जगात इतर देशात ही साजरा केला जातो.दिवाळीला दीप उत्सव ही म्हटले जाते.कारण दिवाळीचा अर्थ दिव्यांचे प्रज्वलन! दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाच्या विजयाला दर्शवते.हिंदू धर्मा व्यतिरिक्त बौद्ध,जैन आणि शीख धर्माचे अनुयायी ही दिवाळी हा सण साजरा करतात.जैन धर्मात दिवाळीला भगवान महावीरांच्या मोक्ष दिवस रूपात साजरे केले जाते तसेच शीख समुदाय याला बंदी छोड दिवस म्हणून साजरा करतात.

वसुबारस पुजा विधी | Vasubaras puja

दरवर्षी अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस (Vasubaras) सण साजरा केला जातो.भारताच्या काही भागात याला गुरु द्वादशी तर काही ठिकाणी गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.शेती व्यवसायाचा प्रमुख आधार असलेल्या गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा हा साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे. हिंदू धर्मात गायीला मातेसमान मानले जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी श्री कृष्णासोबतच गायींची पूजा करतात.

धनत्रयोदशी पूजा विधी (Dhantrayodashi Puja Vidhi)

दिवाळी सणाची सरुवात हि धनत्रयोदशी ने होते.या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात.घर दिव्यांनी सजवतात.धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो.असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो.देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते.बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते.यादिवशी नवी भांडी, सोने-चांदीची दागिने,नाणी विकत घेणे शुभ मानले जाते.सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी,माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर भगवान धन्वंतरी, कुबेरजी, देवी लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्ती पूजागृहात स्थापित करा.यानंतर तुपाचा दिवा लावा आणि फुले व फळे अर्पण करून पूजा सुरू करा.या दरम्यान भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीला पांढरी मिठाई तर भगवान धन्वंतरी यांना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.

धनत्रयोदशीचे महत्त्व (Significance of Dhantrayodashi)

माता लक्ष्मी धनाची देवी मानली जाते.धनत्रयोदशीच्या दिवशी भागवान कुबेर आणि माता लक्ष्मी या दोघांची पूजा केली जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने वैभव,ऐश्वर्य,सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनातील संकटे,अडथळे,संकटे नष्ट होतात

नरक चतुर्दशी | Narak chaturthi

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे.या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे.नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.

श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे -पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता.देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला.हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला.त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले.मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला.
आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील,त्याला नरकाची पीडा होऊ नये.कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले.स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

हे पण पहा --  Diwali Date : यंदा दिवाळीत कोणता सण कधी? वसुबारस ते भाऊबीज जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

लक्ष्मी पूजन | Lakshmi Pooja

दिवाळी दिवशी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.घर आणि दारांना झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे, लक्ष्मीपूजन च्या दिवशी लाकडी चौरंगावर लाल सुती कापड ठेवा आणि मध्यभागी मूठभर धान्य (तांदूळ)  ठेवा.धान्याच्या मध्यभागी कलश ठेवा.कलशात पाणी भरून त्यात एक सुपारी, झेंडूचे फूल,एक नाणे आणि काही तांदळाचे दाणे टाका.कलशावर 5 आंब्याची पाने गोलाकार आकारात ठेवा. मधोमध लक्ष्मीची मूर्ती आणि कलशाच्या उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती ठेवा.

एक लहान थालीपीठ घ्या आणि तांदळाच्या दाण्यांचा एक छोटा डोंगर करा,हळदीपासून कमळाचे फूल बनवा, काही नाणी ठेवा आणि मूर्तीसमोर ठेवा.नंतर पुतळ्यासमोर तुमचा व्यवसाय/खाते पुस्तक आणि इतर पैसे/व्यवसायाशी संबंधित वस्तू ठेवा.आता लक्ष्मी आणि गणपतीला तिलक लावून दिवा लावा.तसेच कलशावर तिलक लावावा.आता गणेश आणि लक्ष्मीला फुले अर्पण करा.त्यानंतर पूजेसाठी आपल्या तळहातावर काही फुले ठेवा.
डोळे बंद करून दिवाळी पूजा मंत्राचा जप करा.तळहातात ठेवलेले फूल गणेश आणि लक्ष्मीजींना अर्पण करावे.लक्ष्मीजींची मूर्ती घेऊन त्यांना पाण्याने स्नान घालावे व नंतर पंचामृताने स्नान करावे.पुन्हा पाण्याने आंघोळ करा,स्वच्छ कापडाने पुसून परत ठेवा.मूर्तीवर हळद, कुंकू,तांदूळ घाला.देवीच्या गळ्यात हार घाला, अगरबत्ती लावा नारळ, सुपारी, सुपारी आईला अर्पण करा देवीच्या मूर्तीसमोर काही फुले आणि नाणी ठेवा.ताटात दिवा घ्या,पूजेची घंटा वाजवा आणि लक्ष्मीची आरती करा.

पाडवा बलिप्रतिपदा | Diawali Padawa

अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्रीविष्णूंनी पाताळात धाडले.तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा याच दिवशी उत्तर भारतात आणि मध्य भारतात नवीन विक्रम संवताचा ची सुरुवात होते.आपल्या महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेरच्या व सासरच्या पुरुष मंडळींना ओवाळतात घरोघरी सकाळी किंवा सायंकाळी अभ्यंगस्नान झाल्यानंतर पाटाभोवती सुंदर रांगोळी काढली जाते. पत्नी पतीला औक्षण करते.आणि पती-पत्नीला ओवाळणी घालतो.
जे नवविवाहित दाम्पत्य असतात त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी होते.दिवाळीतला पाडवा हा वर्षभरातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात मानतात.लक्ष्मी पूजन करून नवीन वर्षाचा प्रारंभ व्यापार्‍यांच्या दृष्टीने हा मानला जातो .

भाऊबीज (Bhaubeej)

दिवाळीतील शेवटचा आणि ५ वा दिवस (5 days of diwali) हा भाऊबीजेचा असतो.सगळ्या बहिणींचा आवडता सण म्हणजे भाऊबीज bhaibeej होय.वर्षभर ज्या सणाची भाऊ आणि बहीण आतुरतेने वाट बघतात तो सण म्हणजेच भाऊबीज .
चार दिवसाची दिवाळी सम्पल्यानंरतर हा भाऊबीजेचा दिवस येतो.ह्या दिवसाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कि ह्या वर्षी हा सण कोणत्या तारखेला कोणत्या रोजी येतोय. दिवाळीचा शेवटचा पण महत्त्वाचा दिवस भाऊबीजेचा.
भाऊबीजेला यम द्वितीया असेही म्हणतात.कारण भाऊबीजेच्या दिवशी यमाची बहीण यमी हिने आपल्या भावाकडे समस्त भावांच्या प्राणांचे दान मागून घेतले होते पण हे दान सृष्टीनियमाविरूद्ध असल्याचे यमाने सांगितले.बहिणीचे मन मोडू नये,म्हणून यमराजाने भाऊबीजेच्या दिवशी शक्यतो भावा-बहिणीची ताटातूट होऊ देणार नाही,असे आश्वासन दिले. तेव्हापासून या सणाला यम द्वितीया असे देखील म्हटले जाऊ लागले.
भाऊबीजेला भावाचे औक्षण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ताटामध्ये कुंकू, फुले,अक्षता,सुपारी,विड्याची पाने, चांदीचे नाणे,नारळ,फुलांच्या माळा, मिठाई,धागा,केळी असावी.या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जाते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment