Close Visit Mhshetkari

आपला सातबारा दोन मिनिटात मोबाईलवर डाऊनलोड करा,सही शिक्क्याची गरज नाही Digital land record

Digital land record : सातबारा उतारा हा कोणत्याही शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र. सातबारा उतारा मिळविण्यासाठी तलाठी कार्यालय आणि त्यासाठी तलाठ्याकडे माराव्या लागणाऱ्या चकरा नव्या नाहीत. पण आता या चकरा मारण्याची आजीबात आवश्यकता नाही. आपण जगाच्या कोणत्याही टोकावरुन घरबसल्या आपल्या जमीनीचा ऑनलाईन सातबारा उतारा मिळवू शकतो.

Download digital Satbar Utar

ऑनलाईन सातबारा (7/12) उतारा कसा काढायचा ?

1. सर्वप्रथम महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईट जावे लागते.ऑनलाईन सातबारा (Satbara utara)7/12 काढण्यासाठी वेबसाईटवर दोन पद्धती दिसतील:

A). Regular Login

B). OTP Login

A). Regular Login – जर तुम्ही आगोदरच यावर Login केले असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागले. त्यात तुम्हाला OTP ची गरज लागत नाही. हा पर्याय जास्त सोईस्कर असतो.

B). OTP Login – यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो.

जर तुम्ही आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

2. सातबारा काढण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर, ‘New User Registration’ इथे क्लिक करून, तुमची वैयक्तिक माहिती भरुन नोंदणी करायची आहे.

3. यानंतर खाली ‘Please Check Availability of your Login Id’ इथे क्लिक करून यूजर नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ वर क्लिक केल्यांनतर तुम्हाला ‘User Registration successful Click Here to Login’ म्हणून मेसेज दिसेल. म्हणजेच तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे.

4. त्या मेसेजे वरील ‘Click Here to ‘Login’ यावर क्लीक करावं. यानंतर तुम्ही निवडलेला यूजरनेम, पासवर्ड आणि ‘Captcha'(कोड वर्ड) टाकून त्यात लॉगिन व्हावे.

हे पण पहा --  Land Record : तुमच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांत काही चूका आहे , कन्फर्मेशन डीडने करा दुरुस्ती 

5. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुमचा जिल्हा, तालुका, गाव टाकून सातबाराचा सर्वे नंबर/गट नंबर टाकून, अंकित सातबारा हा पर्याय निवडावा.

६. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रथम ‘Recharge Account ‘ या पर्यायवर क्लीक करून अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये काही रक्कम घ्यावी लागेल. प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे digital online satbara एक पेज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रु. 15 इतकी किंमत आकारली जाते. ही रक्कम तुम्ही बनवलेल्या सातबारा डिजिटल स्वाक्षरी या ऑनलाईन अकाउंटमध्ये रिचार्ज केलेल्या रकमेतून कमी केली जाते.

Digital online land records

सर्व प्रथम सातबारा (satbara Utara) म्हणजे आपल्या जमिनीचा लेखाजोखा असलेले एक कागदपत्र आहे.जमिनीच्या प्रत्येक कामासाठी या कागदपत्राचा उपयोग केला जातो.सातबारा, गाव नमुना 8A, प्रॉपर्टी कार्ड  इत्यादी कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहज आपल्या मोबाइलवरून काढू शकततात.

सातबारा उतारा (7/12) कसा वाचायचा ?

सातबाऱ्यावर सुरुवातीला गाव नमुना 7 आणि खाली गाव नमुना 12 असतो.

गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.

यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितलं असते.

Agriculture land record

भूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार पडतात.

आमची जमीन भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीत येते.भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात,ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.

भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.

आपला डिजिटल सातबारा उतारा येथे डाऊनलोड करा

Digital Satbara

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

2 thoughts on “आपला सातबारा दोन मिनिटात मोबाईलवर डाऊनलोड करा,सही शिक्क्याची गरज नाही Digital land record”

Leave a Comment