Close Visit Mhshetkari

Crop insurance : 25% टक्के पिकविम्याचा मार्ग मोकळा यांना मिळणार पीक विमा

Crop insurance : भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2022 अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता  अनुदानापोटी राज्य शासनास हिस्सा अनुदानाची  मागणी केली आहे.

खरिप पीकविमा 2023

केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा क्र.13.1.6 नुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्रा व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा हा ग्रीन स्वरूपात पहिला हप्ता कंपनीत अदा करणे आवश्यक आहे.

शासन निर्णयामुळे पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 करता पहिल्या हप्त्यापोटी राज्य शासनाचा 842.17 कोटी एवढा निधी “खरिप पिक विमा” (pik vima) कंपन्यांना वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

पिक विमा योजना

खरीप हंगाम 2022 मध्ये पिक विमा योजना राबवत असताना 1 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, याचबरोबर केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, पिक विमा कंपनीला गेल्या वर्षीच्या पीक विमा हप्त्याच्या 80% च्या 50% म्हणजे एकंदरीत पीक विमा योजना राबवण्यासाठी उपलब्ध केलेल्या निधीच्या 40% निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

हे पण पहा --  Crop insurance : खुशखबर... या शेतकऱ्यांचा पिक विमा झाला मंजूर! शासन निर्णय; पहा संपूर्ण यादी

kharip pik vima

सदर विमा हप्ता अनुदानाची  रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेले एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या 80 टक्क्यांच्या 50 टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात कंपन्यांना द्यावी असे नमूद आहे.

त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून 842,17,84,541/ इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यास अदा करण्यात आली आहे.

खरिप हंगाम 2022

विविध भागांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या 7 लाखांपेक्षा शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे.

त्यांनी नुकसान भरपाई साठी दावा देखील दाखल करण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात 5 सप्टेंबरपासून निधीचे वाटप सुरु होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment