Close Visit Mhshetkari

Crop insurance : खुशखबर… या शेतकऱ्यांचा पिक विमा झाला मंजूर! शासन निर्णय; पहा संपूर्ण यादी

Crop insurance : शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठया प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते.शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

फळपिक नुकसान भरपाई यादी

शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना (Crop insurance) राज्यात सन २०२१-२२ २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एग जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे.

हे पण पहा --  Crop insurance: पीक विमा कंपन्या म्हणतात, कशासाठी द्यावे पैसे? तर या जिल्ह्याचे 25 % अग्रीम मंजूर

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन २०२२-२३ साठी कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्र.५ व ६ अन्वये राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची मागणी सादर केली आहे. सबब, आंबिया बहार सन २०२२-२३ मध्ये राज्य हिस्साची रु.१९६,०७,५२,७५२/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पिक विमा 25% अग्रीम मंजूर जिल्ह्यांची यादी आली, येथे पहा आपले नाव

पिक विमा मंजूर यादी

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२ – २३ अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी रु.१९६,०७,५२,७५२/- इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

फळबाग पिक विमा सविस्तर माहिती व शासन निर्णय येथे पहा

पीक विमा योजना

Leave a Comment