Cotton Season : देशातील हरियाणा,पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील काही मंडईंमध्ये कापसाची नवीन आवक सुरू झाली आहे.महाराष्ट्र राज्यातील नवरात्र उत्सव सुरू होताच कापूस वेचणी हंगाम सुरू होत असतो.
विजया दशमीच्या दिवस जिनिंग मालक कापूस खरेदीचा मुहूर्त ठेवत असतात आणि या दिवसांपासून कापूस काही प्रमाणात बाजारपेठेत येण्यास सुरुवात होते पण या वर्षी चित्र वेगळे आहे.
Cotton season |
कापूस वेचणी हंगाम लांबणीवर!
दसरा आणि दिवाळीचा सण हा पांढऱ्या सोन्यावर अवलंबून राहत असते; पण यावेळी कपाशीची पेरणी वेळेवर झाली पण सातत्याने सर्वच नक्षत्र धो – धो बरसले आणि अतिवृष्टी झाली.त्यामुळे पिकाची वाढ खुंटून तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.या वेळेस भरघोस बोंडे लागत असतात पण सध्या कपाशी पात्यावर दिसून येत आहे.
कापूस वेचणीचा हंगाम लांबणीवर पडणार असून कापूस वेचणीचा हंगाम हा दिवाळीनंतरच सुरू होणार असे चित्र दिसत आहे.नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात कापूस बाजारपेठेत येईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे दिवाळी सणावर आर्थिक सावट राहण्याची शक्यता आहे.
Cotton season in Maharashtra
शेतातील अंदाजे 30 ते 35 टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी केली जाते, त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेचण्या करण्यात येतात. कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले,कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा,असलेला व किडका आणि कवडी कापूस वेगळा वेचावा.प्रत्येक जातीचा कापूस वेगळा साठवावा, वेचल्यानंतर कापूस 3-4 दिवस उन्हात वाळवून स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा.
Cotton crop
कपाशीच्या पिकास घरात येईपर्यंत पैसा खर्च करावा लागतो. त्यातच गेल्या काही वर्षी मजुरांच्या टंचाईची समस्या उभी राहिली आहे. वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्याने होणारे नुकसान वेगळेच असते. असे असले तरी काही वर्षांपूर्वी शेतकरी वर्गास आर्थिक आधार देणारे पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जात होते. आजही कापूस उत्पादक पट्ट्यात शेतकरी कपाशीलाच मुख्य पीक मानतात.