Close Visit Mhshetkari

कपाशीला खताचा तिसरा डोस केव्हा व कोणता द्यावा ? Cotton fertilizer dose

Cotton fertilizer dose : कपाशी पीक घेत असताना शेत जमीनीच्या आरोग्याकड आधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठीच सदर लेखामध्ये कापसाचे योग्य खत व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत.

cotton fertilizer dose
cotton fertilizer dose

कपाशी खताचा तिसरा डोस

कापसाला एकरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 50 किलो पालाश शिफारस केली गेलेली आहे. मात्र त्यासोबतच कापूस हे एक तेलवर्गीय पीक असल्यामुळे कापसाला गंधक (sulphur) या दुय्यम अन्नद्रव्याची npk बरोबरच आवश्यकता असते. सतत कापूस आणि सोयाबीन पिके घेतल्या मुळे जमिनीतील गंधक कमी झालेले आहे त्या मुळे रासायनिक गंधक खत देणे आवश्यक आहे.

कापसाच्या रासायनिक खत नियोजनासाठी फॉस्फरस ऐवजी १२:६१:०० ची २५ किलोची बॅग वापरावी. हे खत ठिबकच्या सहाय्याने दिले तर जास्त फायद्याचे ठरेल. कापूस लागवड करुन ५० दिवस झाले असतील तर ४ किलो युरिया, २ किलो १२:६१:००, आणि १ किलो पांढरे पोटॅश तीन दिवसाआड ठिबकमधून द्यावे. नोव्हेंबरपर्यंत एकरी ६०ते ७० किलो नत्र, ३० ते ३५ किलो फॉस्फरस, आणि ४० किलो पोटॅश द्यावे. जमिनीत ओल असताना खते द्यावी.

हे पण पहा --  Cotton farming : कापूस पिकाचे होऊ शकते मोठे नुकसान, वेळीच करा या किडीचा बंदोबस्त

कापसाच्या झाडाने जमिनीतून जादा नायट्रोजन घेतल्यास मॅग्नेशियमची कमतरता भासल्याने पाने लाल होतात. प्रत्येक महिन्याला खते विभागून द्यावी.१०:२६:२६ चे ३ डोस द्यावे. प्रत्येक महिन्याला २५ किलो युरिया द्यावा, तर शेवटच्या युरिया डोसबरोबर २५ किलो पोटॅश द्यावे. त्याचबरोबर १३:००:४५ चा हप्ता द्यावा.यामुळे बोंडं वजनदार व्हायला मदत मिळेल.

Cotton fertilizer management

  • लागवडीपासून ५० दिवसांनी २५ किलो नत्र, ३५ किलो पालाश, १० किलो गंधक व १० किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे.
  • लागवडीपासून ७० दिवसांनी २५ किलो नत्र (अमोनियम सल्फेटच्या स्वरूपात)
  • लागवडीनंतर ६१ ते १०० दिवस
  • युरिया–२५.३४ किलो–०.६३३ किलो
  • पांढरा पोटॅश–१३.३६ किलो–०.३३४
  • लागवडीनंतर १०१ ते १२५ दिवस
  • युरिया–१५.०० किलो–०.६०० किलो
  • पांढरा पोटॅश–१६.७० किलो–०.६६८ किलो

रासायनिक खत,घटक आणि उपयोग

  • 19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी
  • 12:61:00 :-फुटवा जास्त येण्यासाठी
  • 18:46:00 :-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
  • 12:32:16 :- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
  • 10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
  • 00:52:34 :- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
  • 00:00:50 :- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढणे

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment