Close Visit Mhshetkari

Cotton farming : कापूस पिकाचे होऊ शकते मोठे नुकसान, वेळीच करा या किडीचा बंदोबस्त

Cotton farming : सध्यस्थितीत कपाशीला पाते आणि बोंडे लागण्यास सुरूवात झाली असून पातेगळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.आता हि कपाशीची पातेगळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काय आहे जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल.

जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल.यासाठीच सदर लेखामध्ये कपाशीची पातेगळ आणि बोंडे, बोंडअळी होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काय आहे याची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

कपाशी पातेगळ | kapashi pategal

सर्व प्रथम आपण ‘कपाशीचे पातेगळ होण्याची कारणे’ काय आहेत? याची कारणे जाणून घेऊया.

>> सतत पडणारा पाऊस पडणे अथवा उघाड

>> ढगाळ वातावरण

>> सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता

>> नत्राचा मोठ्या प्रमाणात वापर

>> झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ होणे

कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी उपाय

” कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी उपाय” म्हणून खालील गोष्टींचा अवलंब करायचा आहे जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल.

कपाशी च्या झाडांची वाढ रेग्यूलेट करणाऱ्यासाठी खालील पैकी एक टॉनिकचा (tonic)फवारणी मध्ये सामावेश करावा.

••लियोसिन

•• टाबोली

•• चमत्कार (घर्डा)

सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी खालील कोणत्याही एका विद्राव्य खताची फवारणी करावी.

>> 13:0:45

>> 13.40:13

किटकनाशक टोकन 8Gm किंवा उलाला 6 g

पातेगळ आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कपाशी वर खालील पैकी एक बुरशी नाशक फवारणी करावी

.•• साफ (UPL)

•• अवतार

कपाशीवर कोकडा (कोरडा) असल्यास) 

पोलीस 10gm

किंवा

जंप 3gm

किंवा

दोनीही प्रकाराचे कोकडा नियंत्रण करायचा असेल तर धनुका चे डिसाईड 40gm.किटकनाशक टोकन 8Gm किंवा उलाला 6 gm

कपाशी बोंड सड | Kapashi bondas

कपाशीवरील कीड आणि रोगांचा विचार केला तर कपाशीमध्ये बोंड आळी आणि कपाशीची बोंडे सडणे हे दोन प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे नुकसान जास्त होते.बोंड सडी मध्ये बऱ्याचदा कपाशीची बोंडे बाहेरून निरोगी दिसतात परंतू मधून ती जर फोडून बघितली तर आतून ती गुलाबी आणि पिवळसर लाल रंगाचेहोऊन सडलेली दिसतात.

हे पण पहा --  कपाशी वर चौथी फवारणी कोणती करावी ?Cotton Insecticides Spray

कापूस पिकातील बोंडे सड व त्याचे योग्य व्यवस्थापन!

कपाशी पिकामध्ये बोंडे सडण्याची समस्या बऱ्याच भागामध्ये दिसून येत आहे. त्यामध्ये बहुतेक बोंडे बाह्य भागावरून निरोगी दिसतात. तर काही बोंडांवर रस शोषणाऱ्या किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावाची लक्षणे असतात.साधारणतः बोंडातील एक ते दोन कप्पे तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे आढळते.

Cotton insecticides spray

थोडक्यात 100% पात्याचे बोंडात रुपांतर करण्यासाठी खालील प्रमाणे टॉनिक, विद्राव्य खता आणि बुरशी नाशकाची फवारणी तात्काळ करावी.

चमत्कार (25 (मिली) + 13:00:45 (100ग्रॅम) + साफ 40(ग्रॅम)(cotton insecticides spraspray) 

 कपाशी फवारणी | Kapashi favarni

•• बोंडे चांगले पोसण्यासाठी 90 ते 120 दिवसांनी द्रवखाद 20:20:00 किंवा 13:00:45 पाण्यात विरघळणाऱ्या खतांची 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

पात्याफुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततच्या ढगाळ वातावरण,हवेतील आद्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडरोगाच्या व्यवस्थापनासाठी,बोंडांच्या पृष्ठ भागावर होणारा बुरशींचा संसर्ग रोखण्यासाठी खालील दोन औषधांची फवारणी करावी.

•• कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड (50% WP) 25 ग्रॅम

किंवा

•• पायराक्लोस्ट्राबीन 5%WG (दोन ग्रॅम)

किंवा

•• प्रोपिकॉनाझोल 25%EC (एक मिली)

किंवा

•• ॲझोक्सिस्ट्राबीन (18.2 %WG)

वरील पैकी एक आणि

>> डायफेनोकोनॅझोल 11.4 %SC (10 मिली)

किंवा

>> प्रोपीनेब 70 WP % (25 ग्रॅम)

किंवा

>> स्ट्रेप्टोमायसीन दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी.

•• झिंक, मॅग्नेशिअम आणि बोराॅनची कमतरता भरुन काढण्यासाठी कापसावर आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

टिप :- आपण कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाही.वरिल फक्त शेतकरी बांधवांना माहिती दिली जाते.तरीसुध्दा वकिली अत्पादन वापरताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment