Close Visit Mhshetkari

Cotton Crop Care : या पोळा अमावास्येला ही कपाशी फवारणी करा,अन बोंडअळी पासून नियंत्रण मिळवा

Cotton Crop Care : पिकामध्ये कीडीच्या उपद्रवाचे प्रमाण पाहून आपण शिफारशीत कीटकनाशके फवारत असतो. पण अनेकवेळा आपण ऐकले असेल की अमावस्याच्या दिवशी किंवा पुढे मागे दोन दिवस पिकावर कीटकनाशक फवारणी झाली पाहिजे. पण त्यामागचं कारण माहिती नसल्यामुळे अनेकांना ही अंधश्रद्धा वाटते. असं वाटणं ही स्वाभाविकच आहे. कारण कोणत्याही गोष्टीत अमावस्या-पौर्णिमा हा विषय घुसडला की अंधश्रद्धा डोकं वर काढतेच.

cotton crop care
cotton crop care

Pola Amavasya Kapus Favarni Niyojan

आता 27 28 ऑगस्टच्या दरम्यान अमावस्या येणार आहे. त्या वेळी पोळा देखील असतो. काही भागातील शेतकऱ्यांच्या  कपाशीला पातेधारणा, फुलधारणा किंवा थोड्या फार कपाशीला बोंड लागायला सुद्धा सुरुवात झालेली असते.अमावस्येच्या रात्री अंधार पडण्याची वेळ थोडीशी वाढते,चंद्र उगवून येत नाही त्यामुळे किडीचे पतंग थोडे जास्त सक्रिय होतात आणि त्यांचे अंडी देण्याचे प्रमाण 20 ते 30 टक्यांनी वाढते.परिणामी अमावस्ये नंतर पुढच्या काही दिवसात शेतामध्ये किडीची अंडी व अळी अवस्था काही प्रमाणात वाढलेली दिसते.

Gulabi Bondali Niyantran

गुलाबी बोन्डअळी  (pink bollworm ) चे पतंग जे एक पतंग किमान अंदाजे १८० ते २०० अंडी घालते.त्याचे नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे,हे जाणुन घेण्यासाठी कामगंध सापळे कपाशीच्या झाडाच्या दीड ते दोन फुट उंचीवर एकरी 6 ते 8 शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावावे.पतंग पाऊस पडल्यावर कोषातून बाहेर येतात व त्यांचे आयूर्मान 2 महिने असते त्या 2 महिन्याच्या काळात ज्या अमावश्या येतात त्या त्या वेळी ते अंडी घालतात.

  किडीचे जीवनचक्र हे पतंग-अंडी-अळी- कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थामधून पूर्ण होत असते. 30 ते 40 दिवसांत पूर्ण होणाऱ्या या जीवनसाखळीमध्ये किडींची संख्या अनेक पटीने वाढत असते कारण एका वेळी शेकड्याच्या रात्री किडींच्या पतंगाचा वावर हा असतोच फक्त अमावस्येच्या रात्री अंधाराची वेळ वाढते,गडद अंधार असतो म्हणून किडी जास्त सक्रिय होतात व अंडी देण्याचे प्रमाण थोडे वाढते.

How control pink bollworm

>>  कापुस पिकाला युरिया हे खत जास्त देऊ नका युरियामुळे पीक लुसलुशीत होते,म्हणजे एक प्रकारे ते माजावर येते आणि जास्त प्रमाणात रोग,किळ,अळी पिकावर पडतात.

>>  मोनोक्रोटोफास तसेच असिफेट +इमिडा सारखे औषधी फवारणी आलटून पालटून करावी.जास्त मोनो फवारणी करू नये, नियोनिकोटींन गटातील कीटकनाशके पुन्हा पुन्हा फवारू नका त्यामुळे किडींची प्रतिकार क्षमता वाढते व पुढे कापूस मोठा झाल्यावर या किडीवर नियंत्रण मिळवणे कठीन होते.How control pink bollworm

  >> मोनोक्रोटोफॉस ,असीफेट+इमिडा यांची कापूस पिकावर फवारणी केल्यामुळे झाडांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते व पीक रोगाला लवकर बळी पडते,तसेच लुसलुसीत कापसावर गुलाबी बोंड अळीचा पतंग लवकर आकर्षित होतो आणि तेथे अंडी घालतो.

•• कापुस फुल अवस्थेमधें आल्यानंतर म्हणजेच 55 ते 60 दिवसाचा झाल्यावर योग्य ती व योग्य प्रमाणात फवारणी करावी चांगल्या प्रकारे गुलाबी अळीवर नियंत्रण मिळेल.

••  प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात,हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment