Close Visit Mhshetkari

Changes from 1st December : 1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्या खिशावरही होणार परिणाम; पहा सविस्तर ..

Changes from 1st December : 1 डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये HDFC बँकेच्या Regalia क्रेडिट कार्ड,गॅस किंमत,सिम कार्डसह अनेक नविन नियम लागू केले जाणार आहेत.

Hdfc bank New rule
एचडीएफसी बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्ड संबंधित काही नियमांमध्ये बदल केले असून हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. 1 डिसेंबरपासून लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.मास्टरकार्डच्या ग्राहकांच्या कार्डमधून 25 रुपये कापले जातील पण नंतर ते परत केले जातील.
SIM कार्डसाठी नवीन नियम
केंद्र सरकारने मोबाईल सिम कार्ड खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये बदल केलेले असून नवीन नियम एक डिसेंबर 2023 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे ग्राहकांना आता एका आयडी वरती मर्यादित स्वरूपात सिम कार्ड खरेदी करता येणार आहे.त्याचबरोबर नवीन नियमानुसार सिमकार्ड विक्रेत्यांना नोंदणी करण्यापूर्वी आणि सिस्टममध्ये सामील होण्यापूर्वी केवायसी प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
एलपीजी किंमत ठरणार?
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी किमतीमध्ये प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बदल होत असतो. म्हणजेच महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन किमती जाहीर केल्या जातात. आता लग्नसराई मध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढण्याची शक्यता असून घरगुती सिलेंडर बाबतीत दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment