Close Visit Mhshetkari

Blue aadhar card : म्हणजे काय? कोणासाठी असते हे निळे आधार कार्ड ? पहा सविस्तर माहिती

Blue aadhar : आधार कार्ड हा भारतीय व्यक्तींच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेला आहे.तुम्हाला माहिती आहे. की आधार कार्ड चे अनेक प्रकार पडतात यामध्ये आधार कार्ड प्लास्टिकचे असल्यास त्याला पीव्हीसी आधार कार्ड म्हणतात.आज आपण निळे आधार कार्ड म्हणजे काय? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Aadhar card New update

सर्व भारतीयांचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड याद्वारे ओळख पत्ता बँक या सर्वांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. बँक खाते उघडायचे असो की बँक खात्यात एक केवायसी करायचे असेल किंवा कोणती सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, आधार कार्ड लागतेच अगदी सिलेंडरपासून सिम कार्ड खरेदी करायचा असला तरी सुद्धा आधार कार्ड ची गरज असते.शाळेतील मुलांच्या ऍडमिशन साठी सुद्धा आता आधार कार्ड सक्ती करण्यात आली आहे. 

तुम्ही कधी निळे आधार कार्ड पाहिले आहे का? हे ब्लू आधार कार्ड म्हणजे काय आणि ते कोणासाठी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.तुम्ही देखील घरबसल्या ब्लू आधार कार्ड बनवू शकता? आपल्यापैकी अनेकांना निळ्या आधार कार्डबद्दल माहिती नसेल.

ब्लू आधार म्हणजे काय?

भारत सरकारने सन 2018 मध्ये लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याची सुविधा सुरू केली होती यालाच ब्ल्यू आधार किंवा बाल आधार असे म्हणतात. लहान मुलाचे आधार कार्ड हे निळ्या रंगात येत असल्यामुळे त्याला ब्ल्यू आजार असे नाव देण्यात आले. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी व्हायच्या मुलांसाठी हे आधार कार्ड बनवल्या जाते. त्यानंतर पाच वर्षानंतर या आधार कार्ड मध्ये अपडेशन करून रेगुलर आभार आधार कार्ड मिळते.

हे पण पहा --  Fake Aadhaar Card : तुमच्याकडेही असू शकते बनावट आधार कार्ड, क्यूआर कोड व नावाद्वारे असे ओळखा ...

निळ्या आधार कार्ड साठी बायोमेट्रिक आवश्यक नसते सामान्य आधार कार्ड पेक्षा आहे आधार कार्ड वेगळे असते. ब्ल्यू आधार कार्ड बनवण्यासाठी पाच वर्षाखालील मुलांना बायोमेट्रिक घेतले जात नाही.यूआयडी वर लोकसंख्या शास्त्रीय माहिती आणि त्याच्या पालकांच्या यूआयडीसी जोडलेल्या छायाचित्रांवर आधारित प्रक्रिया युआयडीसी जोडलेल्या छायाचित्रावर केली जाते.पाच ते पंधरा वर्षे झाल्यानंतर त्यांच्या बायोमेट्रिक्स अपडेट कराव्या लागतात.

ब्लू आधारसाठी कसे करावे अप्लाय ?

  • UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा.
  • आधार कार्ड नोंदणीचा पर्याय निवडा.
  • मुलाचे नाव, पालक/पालकांचा फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  • आता आधार कार्ड नोंदणीसाठी अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • जवळचे नावनोंदणी केंद्र शोधा आणि भेटीची वेळ घ्या.
  • तुमचा आधार, मुलाची जन्मतारीख, संदर्भ क्रमांक इत्यादीसह आधार केंद्रावर जा.
  • यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक दिला जाईल, ज्याद्वारे तुम्ही त्याचा मागोवा घेऊ शकता.

येथे करा आधार कार्ड अपडेट्स

आधार कार्ड अपडेट्स

Leave a Comment