Bank Locker Rule : मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपण आपले पैसे महत्त्वाचे कागदपत्रे दागिने बँक लॉकरमध्ये ठेवत असतो. आता अशा ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून मौल्यवान वस्तू दागिने आणि कागदपत्रे ठेवण्यासंदर्भात आरबीआयने नवीन नियम लागू केले आहे. तर काय आहे नियम पाहूया सविस्तर माहिती
RBI New Bank Locker Rules 2024
आजकालच्या जमान्यात ऑनलाइन पेमेंट आणि डिजिटल युगात फार कमी लोक रोख रक्कम बाळगतात. आरबीआयने काही दिवसांपूर्वी बँक लॉकर सिस्टमशी संबंधित लागू केला होता. नियम आधीच होता आणि त्यात काही बदल करण्यात आले आहेत.
आरबीआयने बदलले बँक लॉकरचे नियम
रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने ग्राहकांच्या सुरक्षा व सुविधा लक्षात घेऊन नियमांमध्ये मोठे बदल केले आहे यावर्षी आरबीआयने लॉकर संदर्भित नियम बदलले असून तुम्हीही कोणत्याही बँकेचे लॉकर घेतले असेल किंवा घेणार असाल तर तुमची मौल्यवान वस्तू ठेवणे आधी खालील नियम समजून घ्या
बँक लॉकरचा नियम काय?
आरबीआयच्या नवीन नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने आपले सामान बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले असेल ते खराब झाले तर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी बँकेची असणार आहे बँक ग्राहकांना लॉकर च्या वार्षिक भाड्याच्या शंभर पट रक्कम देण्यास ग्राहकांना बांधील राहील.याशिवाय बँकेत आग, दरोडा किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती घडल्यास बँक स्वतः ग्राहकाला त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देईल.
बँकेत लोकर कसे घ्यायचे?
जर तुम्हालाही तुमच्या घरातील मौल्यवान वस्तू कागदपत्रे किंवा पैसे बँक लॉकर मध्ये ठेवायचे असेल तर जवळच्या बँकेत संपर्क साधून लॉकर खाते उघडावे लागते या ठिकाणी गेल्यानंतर प्रथम प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य वाटप केल्या जाते बँकेत उपलब्ध असल्यास आपल्याला लॉकर दिले जाईल आणि त्यासाठी वार्षिक आधारावर काही शुल्क आकारले जाते.