Bank Holidays : 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.पण त्यापूर्वीच चार दिवस बँकेचे काम ठप्प राहणार आहे.बँकांना सुट्टी नसून बँकांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन(UFBU) ने 30 आणि 31 जानेवारीला संपाची घोषणा केली आहे.
Bank holidays latest news
28 जानेवारी रोजी चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने सलग चार दिवस बँका बंद असणार आहेत.बँकेचे कोणतेही काम असेल तर ते तुम्हाला उद्याच म्हणजे 27 जानेवारीलाच करावे लागणार आहे.
सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने दबाव आणण्यासाठी आता कर्मचारी 30 जानेवारीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत.UFBU ने 13 जानेवारी रोजी संपाची घोषणा केली होती.
Bank employee’s strike
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ला पत्राद्वारे पाठवल्या आहेत.
परंतू यावर बँक असोसिएशन कडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.या कारणास्तव कर्मचाऱ्यांसमोर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जाणे हाच मार्ग उरला आहे.
Old Pension/NPS Update
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सरचिटणीस सी.एच.वेंकटचलम यांच्या म्हणण्यानुसार बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 5 मागण्या आहेत.
- बँकिंगचे 5 दिवसचा आठवडा करावा
- NPS रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरू करणे
- पगारवाढीसाठीही चर्चा करणे
- सर्व संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू करणे