Close Visit Mhshetkari

Atal Pension Yojana : दरमहा फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा वार्षिक 60,000 रुपये पेन्शन

Atal Pension Yojana : केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेत (एपीआय) मोठे बदल केले आहेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ ऑक्टोबर २०२२ पासून आयकर भरणारी व्यक्ती या योजनेत सहभागी होण्यास पात्र ठरणार नाही. ही योजना मोदी सरकारने २०१५ मध्ये सुरू केली होती. ही योजना मुख्यत्वे असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे.

Atal pension yojana
Atal pension yojana

Atal Pension Yojna in Marathi

  इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल, तर सरकारी अटल पेन्शन योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकणार नाही.वित्त मंत्रालयाने या संदर्भात एक आदेश जारी केला असून तो १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना यापुढे अटल पेन्शन योजनेमध्ये पैसे गुंतवता येणार नाहीत. सध्या ज्या करदात्यांनी ‘अटल पेन्शन योजने’अंतर्गत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे, ती गुंतवणूक पुढे सुरू ठेवता येणार आहे, मात्र नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या करदात्यांना येत्या १ ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजना(Atal Pension Yojna in Marathi) गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे दिली आहे.

Atal pension Yojana updates

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर, दरमहा १,००० ते ५,००० रुपये पेन्शन मिळते.१८ वर्षे ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. म्हणजेच यामध्ये किमान २० वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. दरमहा १ ते ५ हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा ४२ ते २१० रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या ४० व्या वर्षी ही योजना घेतली तर त्याला दरमहा २९१ रुपये ते १,४५४ रुपये योगदान द्यावे लागेल. सबस्क्रायबर जितके जास्त योगदान देईल तितके जास्त पेन्शन त्याला निवृत्तीनंतर मिळेल.

अटल पेन्शन योजना (APY)

 आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये अटल पेन्शन योजना (APY) सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. अवघ्या 6 वर्षात ही योजना 4 कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे.

या योजनेत केवळ गेल्या आर्थिक वर्षात 99 लाख लोक सामील झाले. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार,आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस 4.01 कोटी लोक या योजनेत गुंतवणूक करत होते.

अटल पेन्शन योजना माहिती

अटल पेन्शन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेत किमान 20 वर्षे मासिक पैसे जमा करणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात किती योगदान द्यायचे हे लाभार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते.

वयाच्या 18 व्या वर्षी,जास्तीत जास्त 5000 महिन्यांच्या पेन्शन मर्यादेसाठी, त्याला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 25 व्या वर्षी जोडल्यास योगदान दरमहा 376 रुपये, तर 30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577 रुपये, 35 वर्षांच्या लोकांसाठी 902 रुपये आणि 39 वर्षे वयाच्यांसाठी 1318 रुपये योगदान आहे.पती-पत्नी असे संयुक्त खाते उघडता येते.

हे पण पहा --  Senior citizen schemes : ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण सहा योजना ! पहा त्यांचे फायदे व सविस्तर माहिती ...
SBI अटल पेन्शन योजना खाते ऑनलाइन उघडणे
 
“SBI अटल पेन्शन योजना खाते ऑनलाइन उघडणे” साठी खालील टप्पे आहेत
 
>> अटल पेन्शन योजनेच्या फायद्यांचा वापर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे SBI सह ऑनलाइन बँकिंग असणे आवश्यक आहे. 
 
>> एखाद्या व्यक्तीने यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर, संबंधित व्यक्तीला एसएमएस आणि ईमेलद्वारे पुष्टीकरण प्राप्त होईल. भविष्यात, PRAN क्रमांक तयार केला जाईल आणि संदर्भ क्रमांक म्हणून वापरला जाईल.
 
>> माय अकाउंट्स विभागातून सामाजिक सुरक्षा योजना’ निवडा.
 
>> ड्रॉप-डाउन पर्यायातून अटल पेन्शन योजना फॉर्म निवडा, त्यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करा. 
 
>> जन्मतारखेच्या आधारे प्रीमियम योगदान स्वयंचलितपणे निवडले जाईल. एखादी व्यक्ती ईमेल पत्ता, नॉमिनी आणि कायमचा पत्ता यासारखी माहिती देखील जोडू शकते.
 
>> प्रत्येक महिन्याला योगदान दिलेल्या रकमेबद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी एसएमएस अलर्ट पर्याय निवडा. 
 
>> खात्यातून अटल पेन्शन योजना खात्यात मासिक शिल्लक हस्तांतरणाचा स्थायी आदेश देखील स्वयंचलितपणे केला जाईल.
 
>> एपीवाय फॉर्मसाठी पोचपावती ऑनलाइन दाखल केल्यावर स्टेटस मेनूमधून पुनर्प्राप्त केली जाऊ शकते.
 
अटल पेन्शन योजना मराठी
वय १८ वर्ष
कालावधी ४२
मासिक हप्ता २१०
मिळणारे निवृत्ती वेतन – ५०००
वारसास मिळणारी जमा राशी – ८.५ लाख रुपये
वय -२०
कालावधी – ४०
हप्ता- २४८
पेन्शन- ५०००
वारसाला मिळणार रक्कम – ८.५ लाख रुपये
वय -२५
कालावधी-३५
हप्ता- ३७६
पेन्शन- ५०००
वारसाला मिळणारी रक्कम – ८.५ लाख रुपये
वय – ३०
कालावधी – ३०
हप्ता – ५७७
पेन्शन- ५०००
वारसाला मिळणारी रक्कम – ८.५ लाख रुपये
वय – ३५
कालावधी – २५
हप्ता – ९०२
पेन्शन -५०००
वारसाला मिळणारी रक्कम – ८.५ लाख रुपये
वय – ४०
कालावधी -२०
हप्ता – १४५४
पेन्शन – ५०००
वारसाला मिळणारी रक्कम – ८.५ लाख रुपये
Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment