Close Visit Mhshetkari

Animal Husbandry Schemes : जि. प. पशुसंवर्धन विषयक योजनांना उद्यापर्यंत मुदतवाढ; या संकेतस्थळावर करा अर

Animal Husbandry Schemes : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग व राज्यशासन यांच्यामार्फत पशुपालकांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण पशुपालकांसाठी शेळी गट व दुधाळ जनावर वाटप या योजना राबविल्या जात आहेत.

ZP Animal Husbandry Schemes 2024

सदरील योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता असलेली १५ डिसेंबरची मुदत वाढवून ही १८ डिसेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीसाठी १० +१ शेळीगट वाटप केले जाते त्यासाठी ७७ हजार ५६९ रुपये (७५ टक्के) अनुदान दिले जाते. तसेच २ दुधाळ जनावरांचा गट यात १ लाख १७ हजार ६३८ रुपये गायगटासाठी तर, १ लाख ३४ हजार, ४४३ रुपये म्हैसगटासाठी अनुदान आहे. अनुसूचित जमातीगटात १० +१ शेळीगट वाटप केले जाते त्यासाठी ७७ हजार ५६९ रुपये अनुदान दिले जाते.

सर्वसाधारण प्रवर्गात १०० एकदिवसीय कुक्कुट गट वाटपासाठी १४ हजार ७५० (५० टक्के) तर, २५ +३ तलंगा गट वाटपात ५ हजार ४२० रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यासाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत होते. त्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत होती.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग योजना

जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत खालील योजनांचे समाधानकारक अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यस्तरीय योजनामध्येही १०+१ शेळीगट, दुधाळ जनावराचा गट वाटप व १००० मांसल कुक्कुट पक्षीगृह बांधकाम या योजनांसाठी अर्ज करता येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

https://ah.mahabms.com

मोबाईल व्दारे अर्ज करण्यासाठी अॅप AH.MAHABMS

तरी जिल्हयातील अनु जाती,अनु. जमाती व सर्वसाधारण पशुपालक यांनी खालील योजनांमध्ये अर्ज भरून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभाग यांनी केले आहे.

 आवश्यक असलेली पात्रता काय आहे?
  1. अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. अर्जदार व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  3. अर्जदार व्यक्तीचे उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत?
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
  • अर्जदाराने पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
  • अर्जाची प्रिंट, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरलेला धनादेश/डिमांड ड्राफ्ट सोबत घेऊन संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत काय आहे?

जिल्हा स्तरीय योजनांसाठी १८ डिसेंबर २०२३ आहे.

राज्यस्तरीय योजनांसाठी ३१ डिसेंबर २०२३ आहे.

Leave a Comment