Close Visit Mhshetkari

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार मोठे गिफ्ट! येणार हे तीन निर्णय

D7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात सरकार मोठ गिफ्ट देणार आहे.2023 च्या सुरुवातीलाच सरकार कर्मचाऱ्यांसाठी तीन निर्णय घेणार आहे.नववर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेला महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.यासह कर्मचाऱ्यांबाबतीत 3 मुद्द्यांवर सरकार लवकरच  निर्णय घेणार आहे.

7th pay commission update

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या  update नुसार महागाई भत्त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जातो.AICPI डेटाच्या आधारे,महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो.ही वाढ साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये होते.दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात DA hike वाढ होणार आहे. जानेवारी 2023 चा महागाई भत्ता मार्चपूर्वी जाहीर केला जाईल.

DA hike news

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता  हा कामगार मंत्रालयाने AICPI ची आकडेवारी जाहीर केली जाते यावरून ठरतो. सप्टेंबरमध्ये AICPI चा हा आकडा 131.2 इतका होता.जूनच्या तुलनेत सप्टेंबर 2022 पर्यंत एकूण AICPI निर्देशांक 2.1 टक्क्यांनी वाढला आहे.गेल्या महिन्याच्या ऑगस्टच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तर ऑक्टोबर,नोव्हेंबर आणि डिसेंबरचे AICPI निर्देशांक अजून आलेला नाही.

हे पण पहा --  DA Hike update : महागाई भत्त्याबाबत समोर आली मोठी अपडेट्स! आता होळीला मिळणार 'एवढी' वाढ

DA Hike Calculator

नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 3 ते 5 % नी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो 42 किंवा 43 % होईल. 4% नी वाढ झाल्याने 18,000 रुपये पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 720 रुपये आणि वार्षिक वेतन 8,640 रुपये मिळणार आहे.त्याचप्रमाणे 56900 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीएमध्ये दरमहा 2276 रुपये आणि वर्षाला 27312 रुपयांची वाढ होऊ शकते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment