7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली असून गेल्या अनेक दिवसापासून पेंडिंग असलेला महागाई भत्ता वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकारी सूत्रानुसार मागे भत्ता वाढीसाठी हिरवा कंदील मिळालेला असून लवकरच कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार आहे तर बघूया
महागाई भत्ता वाढीस हिरवा कंदील
सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार,महागाई भत्ता वाढीची घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस किंवा नवरात्रीच्या सणासुदीच्या सुमारास होऊ शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून यावेळी 3 टक्के महागाई भत्ता वाढीला हिरवा कंदील दाखविला जाणार आहेआहे. सदरील निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्याचा आकडा 42 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर जाणार आहे.
सध्या AICPI निर्देशांकाचा जूनचा डेटा आज येईल. मात्र, असलेला 42 % डीए आगामी काळात 45 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 % महागाई भत्ता थकबाकीसह दिला जाणार आहे.
Maharashtra Employees DA updates
महाराष्ट्र राज्य शासनाचा विचार केला तर कुठल्याही प्रकारचे अपडेट अजून तरी देण्यात आलेली नाही.साधारणपणे गणेशोत्सवाला सुरुवात होण्यार असल्यामुळे 19 सप्टेंबरच्या आसपास हा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच यासंबंधीचा जीआर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वीच निर्गमित केली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ लागू केला जाईल असे साधारणपणे सांगण्यात येत आहे.जर आपण याबाबतीत जर अनेक मीडिया रिपोर्टचा आधार घेतला तर यानुसार महाराष्ट्रातील 17 लाख पेक्षा जास्त राज्य कर्मचाऱ्यांना 3 % महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे.