5G service in India : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G इंटरनेट सेवेची औपचारिक घोषणा केली.भारत 5G सेवा देणाऱ्या देशांच्या यादीत आणखी एक पाऊल टाकणार आहे.मात्र,Jio 5G सर्विस, 5G Launch, 5G Phone, 5G Price आणि Jio 5G SIM संबंधी सविस्तर माहिती देत आहोत,जाणून घेऊया सविस्तर माहिती.
5G Network Services in India
5G भारतातील गावोगावी कधी पोहोचेल? Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने देशाच्या कानाकोपऱ्यात 5G इंटरनेट पसरवण्याची तयारी केली आहे.जिओने देशातील प्रत्येक गावात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चर्चा केली आहे. मात्र,ते अजूनही दूरचे मानले जाते. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, ही सेवा गावोगावी पोहोचण्यासाठी किमान दीड वर्ष लागू शकतात. त्याचवेळी मोबाईल कंपन्या असाही दावा करत आहेत की,5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत त्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील.
5g launch in india 8 Cities
पहिल्या टप्प्यात 13 शहरांना 5G सेवा मिळणार आहे. ही दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, चंदीगड, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे आहेत.
Is need of new sim for 5g
एअरटेल ग्राहकांना 5G नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी नवीन सिमची आवश्यकता नाही.एअरटेल सदस्यांना लिहिलेल्या पत्रात सीईओ गोपाल विट्टल यांनी अलीकडेच म्हटले आहे, “तुमचे एअरटेल सिम आधीच 5G सक्षम आहे. त्यामुळे ते तुमच्या 5G स्मार्टफोनवर अखंडपणे काम करेल.” तथापि, कंपनीने पुनरुच्चार केला आहे की 5G नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्राहकांकडे 5G फोन असणे आवश्यक आहे. त्यांना त्यांचे विद्यमान 4G सिम बदलण्याची गरज नाही.
5G सिमची गरज लागणार?
आता प्रश्न आहे की, यूजर्सला 5G सिमची गरज असेल का?, आज स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे की 5G सेवा फक्त 4G सिमवर उपलब्ध असेल की नवीन सिम घेण्याची आवश्यकता आहे.सिमद्वारे, तुम्हाला फक्त एकच युनिक आयडी दिला जातो आणि त्या आयडीनुसार तुमच्या नंबरवर प्लॅन सक्रिय केला जातो.यावर एअरटेलने घोषणा केली आहे की,ज्या लोकांनी आपल्या सिमला ४जी मध्ये अपग्रेड केले आहे.त्यांना आपल्या सिमला अपग्रेड करण्याची गरज नाही. कारण, हे आधीच 5 जीला सपोर्ट करणारे आहे. ज्यांना ५जी कधी लाँच होणार हे जाणून घ्यायचे आहे त्यांनी एअरटेल थँक्स अॅपवर जावून थँक्स अॅपवर जावून यासंबंधी माहिती मिळवू शकतात. आता जिओ आणि VI कडून यासंबंधी कोणतीही अपडेट देण्यात आली नाही.
फोनमध्ये 5G सेवा कशी चालवायची ?
५जी स्मार्टफोन घेतलेल्या मोबाईल वापरकर्त्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. जर ऑपरेटर्सना मोबाईल फोनमध्ये ५जी चालवायचे असेल तर त्यांना वेगळे ५जी सिम खरेदी करण्याची गरज नाही. ग्राहक त्यांच्या ४जी सिमवरच ५जी नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतील आणि त्यावर सुपर फास्ट ५जी इंटरनेट देखील चालवू शकतील. ही चांगली गोष्ट आहे की ५जी नेटवर्कसाठी, तुम्हाला तुमचा सिम किंवा मोबाईल नंबर जिओ, एअरटेल किंवा Vi कोणत्याही ग्राहकाला पोर्ट करावा लागणार
5G Network Speed
स्टँडअलोन ५जी आणि नॉन स्टँडअलोन ५ जी स्टँडअलोन 5G आणि नॉन स्टँडअलोन 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एक्स ५० मॉडम किंवा त्यावरच्या व्हर्जनमध्ये येणाऱ्या अनेक फोन या दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करते. म्हणजेच ड्युअल मोड 5G कंपेटिबल फोन असतात. नॉन स्टँडअलोन अॅक्सेस 5G नेटवर्क सध्याच्या 4G नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर मध्ये काही बदल करू शकते. याचा परिणाम चांगली स्पीड आणि बँडविथ वाढवण्यासाठी होतो.परंतु, लो लेटेंसी मध्ये कमी सुधारणा पाहायला मिळेल.
सिमच्या आकारात कोणताही बदल होणार नाही
सध्या बाजारात 2G, 3G आणि 4G सिम आहेत.सध्या,फीचर फोन वापरकर्ते 2G सिम वापरतात, स्मार्टफोन वापरकर्ते 3G आणि 4G दोन्ही सिम कार्ड वापरतात.5G सिमबद्दल बोलायचं झालं तर तर ते सध्याच्या 4G सिमसारखे असेल. मिळालेल्या माहितीनुसार, 4G सिमच्या आकारात किंवा शेपमध्ये कोणताही बदल होणार नाही.