Close Visit Mhshetkari

कोलेस्ट्रॉल – आपल्या आरोग्याचा न दिसणारा शत्रू | Cholesterol

Cholesterol हा तुमच्या रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे.निरोगी पेशी तयार करण्यासाठी तुमच्या शरीराला कोलेस्टेरॉलची गरज असते,परंतु कोलेस्टेरॉलची उच्च पातळी हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.चरबीसारखा एक पदार्थ असतो ज्‍याची निर्मिती आपल्‍या ऱ्हदयात होते तसेच आपण घेत असलेल्‍या पुष्‍कळशा खाद्यपदार्थांमध्‍ये देखील हे आढळते.

आपल्‍या शरीरात आपल्‍याला आवश्‍यक असलेल्‍या सर्व कोलेस्‍ट्रॉलचे उत्‍पादन होत असते,आपणांस कोलेस्‍ट्रॉलची आवश्‍यकता पुष्‍कळशा महत्‍वपूर्ण शारीरिक क्रियांसाठी आवश्‍यक असते. तर आज आपण कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारणे,लक्षणे,घ्यावयाची काळजी आणि आयुर्वेदिक उपचार या सगळ्याची माहिती या लेखात पाहणार आहोत.

Cholesterol
Cholesterol

Cholesterol

बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या बदलत्या सवयींमुळे सध्या 30 वर्षांपेक्षा जास्त लोकांमध्ये ‘Cholesterol’ वाढण्याचे प्रकार समोर येत आहेत.जे लोक व्यायाम करत नाहीत,आणि जास्त तणावाखाली असतात त्यांच्यात कोलेस्टेरॉल वाढते.

गुड कोलेस्टेरॉल व बॅड कोलेस्टेरॉल

चांगल्या कोलेस्टेरॉलमध्ये उच्च घनतेची प्रथिने असतात तर खराब कोलेस्टेरॉलमध्ये कमी घनतेची प्रथिने असतात. या सर्वांपैकी फक्त काही प्रमाणात शरीरासाठी चांगले असते. याशिवाय कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सही आढळतात. शरीरातील सामान्य कोलेस्टेरॉलचे प्रमाण (200 mg/dL किंवा कमी) असावे. बॉर्डरलाइन कोलेस्ट्रॉल (200 ते 239 mg/dL) आणि उच्च कोलेस्ट्रॉल (240 mg/dL) दरम्यान असावे.चांगले कोलेस्टेरॉल (HDL) पेशींमधून परत यकृताकडे वाहून नेतो.यकृतामध्ये जाऊन ते एकतर तुटले जाते किंवा टाकाऊ पदार्थांसह शरीराबाहेर काढले जाते, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकला प्रतिबंध होतो. मधुमेह,हायपरटेन्शन,किडनीचे आजार, यकृताचे आजार आणि हायपरथायरॉईडीझमने ग्रस्त असलेल्या लोकांमध्येही कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते.गु

 

कोलेस्ट्रॉल
कोलेस्ट्रॉल

 

कोलेस्टेरॉल वाढल्याचे लक्षणे

 

कोलेस्टेरॉल थोडेसे वाढले की लक्षणे दिसत नाहीत पण जेव्हा ते जास्त वाढते तेव्हा खालील लक्षणे दिसतात. कोलेस्टेरॉल वाढल्याचे लक्षणे

1.वजन वाढते आणि लठ्ठपणाची समस्या उभी राहते.

2. उच्च रक्तदाबाची (high blood pressure) समस्या सुरू होते.

3. मधूमेह आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.

4. असामान्य कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका,पक्षाघात आणि नपुंसकत्व इत्यादी समस्या तयार होण्याची शक्यता असते.

5. पायऱ्या चढताना थकवा जाणवतो,श्वास आणि हृदयाचे ठोके वाढतात.

6. चालताना पाय दुखण्या सारख्या समस्या जाणवतात.

 

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारणे

मांस,लोणी,दूध,तूप,पनीर,अंडे,केक इत्यादी कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करणं.

अंड्यामध्ये (पिवळ्या बलक) मध्ये खूप फॅट असते त्यामुळे अंडी अति सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढते.

वयाच्या विशीनंतर स्त्री – पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते,पण रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये याचा परिणाम थोडा जास्त दिसतो.

वजन वाढल्यानंतर ट्राइग्लिसराइड वाढायला लागतं.ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं.

थायरॉइड, किडनी व यकृताच्या आजारही कोलेस्ट्रॉल वाढवतात.

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मार्ग

1. आहारात अधिकाधिक हंगामी फळे,फायबरयुक्त पदार्थ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

2. सकाळच्या नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स आणि ओट्सपासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन करावे.

3. नियमित व्यायामामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

4. दुधाच्या चहाऐवजी काळा किंवा हिरवा चहा घ्यावा.काळ्या किंवा ग्रीन टी च्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

5. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असताना लाल मांसाचे सेवन करणे शक्यतो टाळावे.

6. दूध,लोणी,तूप,मलई आणि आईस्क्रीम यांसारखे पदार्थ खाणे टाळावे ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते.

7. धुम्रपान आणि दारूच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉल वाढते,त्यामुळे सिगारेट-दारूचे सेवन करणे टाळावे.

8.अंड्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मार्ग

कोलेस्टेरॉलपासून सुटका करायची असेल तर काय काळजी घ्यावी?

» जेवण बनवताना वारंवार उकळवलेल्या तेलाचा वापर केल्यास ट्रान्स फॅटची पातळी वाढते.

» लाल मांस,दूग्धजन्य पदार्थ,तूप आणि खोबरेल तेलाचा वारंवार वापर केल्याने लो डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एलडीएल)चं प्रमाण वाढतं.कारण त्यात संतृप्त मेद अधिक असतो.अशा प्रकारच्या सेवन कमी करून ताजे,प्रक्रियारहित अन्न आहारात घ्यावे.अंड्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.

» आपण नियमितपणे आपला आहारात कोशिंबिरीचा आणि कच्च्या फळांचा समावेश करावा.

» आपल्या आहारात मैदा, ब्रेड, पांढरा भात,बिस्किटांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थाचा उपयोग कमीत कमी करणं महत्त्वाचं आहे.

» सालासकट असलेली धान्य,न सडलेली धान्य म्हणजे लाल तांदूळ,लाल पोहे,सालासकट असलेल्या डाळी इत्यादींचा जेवणात समावेश करावा.

» बदाम हा असा अन्नघटक आहे ज्यामुळे शरीरात हाय डेन्सीटी लिपोप्रोटिन्स (एचडीएल) कोलेस्टेरॉल वाढते.तसंच आहारात अळशीचा नियमित वापर केल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

» आहारात तेलाचा वापर कमी ठेवा. मग ते फिल्टर तेल असो किंवा रिफाईन कारण रिफाईन तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते आणि फिल्टर तेलावर यांत्रिक.

» याशिवाय साली-कोंड्यांसकट असलेली धान्यं,प्रक्रियारहित अन्न,फळे आणि भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात नियमित करावा.

» अळशी,सूर्यफूल बिया आणि चरबीयुक्त मासे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदतीचे ठरतात.अधिक प्रमाणात मेद असलेले दुग्धजन्य पदार्थ न घेता कमी प्रमाणात मेद असलेले पदार्थ वापरावेत.

» नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे.नियमित साधे चालणे,सायकल चालविणे,पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळल्याने मदत होऊ शकते.

कोलेस्ट्रॉलवर आयुर्वेदिक उपाय

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या उपचारासाठी आयुर्वेदात अनेक औषधी उपलब्ध आहेत,ज्यांचे नियमित सेवन केल्याने नियंत्रण ठेवता येते.कोलेस्ट्रॉलवर आयुर्वेदिक उपाय

1. आरोग्यवर्धिनी वटी, पुनर्नव मंदूर, त्रिफळा,अर्जुन साल यांचे चूर्ण घेतल्याने फायदा होतो.

2. अंबाडीच्या बिया बारीक करून रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्या,उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी ते खूप फायदेशीर आहे.

3. मेदोहर वटी आणि नवक गुग्गल वटी कोमट पाण्यासोबत घेतल्याने फायदा होतो.

4. लसूण रक्तातील उच्च कोलेस्टेरॉलचा प्रभाव पूर्णपणे नियंत्रित करतो.

5. त्रिकाटू कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

 मित्रांनो “कोलेस्ट्रॉल” विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment