Close Visit Mhshetkari

Rajiv Gandhi gharkul: राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना अंतर्गत मिळणार घरकुल

Rajiv Gandhi gharkul: महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल/बेघर/अल्पभूधारक गरजूसाठी घरे बांधण्यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना सुरु केलेली आहे.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.१ ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी आहे. ही योजना इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविली जाते.राजीव आवास योजना दोन टप्प्यात लागू करण्यात
देशाला झोपडपट्टी मुक्त बनवण्याच्या उद्देश्याने लाँच करण्यात आले आहे. ही योजना आवास आणि शहरी गरीबी निर्मूलन विभागामार्फत राबवली जाते.

ही एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे.योजनेची तयारी २०११ मध्ये सुरू झाली आणि २०१३ मध्ये संपली.सुरुवातीच्या टप्प्यात झोपडपट्टी विकास योजना राबवली गेली. २०१३ मध्ये ही योजना प्रत्यक्ष राबवली गेली. केंद्र सरकारने २०१३ ते २०२२ या कालावधीत योजनेच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली आहे.

Rajiv Gandhi gharkul yojana maharasthr

  • प्रत्येक घरकुल बांधकामाचा खर्च –  रु. 1,00,000/-
    लाभार्थीचा स्वत:चा हिस्सा – रु. 10,000/-
    बँके कडून कर्ज स्वरुपात उपलब्ध होणारा 31 निधी – रु. 90,000/-
  • कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 96,000/- पेक्षा जास्त नसलेल्या इच्छूक लाभार्थ्यांची घरकुल बांधकामासाठी
  • स्वत:ची किंवा शासनाने/ ग्रामपंचायती-ने दिलेली जागा असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांने सुरुवातीस रु. 10,000/-इतकी रक्कम स्व:हिस्सा भरण्यास तयार असले बाबत ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.

राजीव गांधी निवारा धरकुल योजना नियम व अटी

  1. घरकुलासाठी प्रस्तावीत केलेली जागा बोजारहीत असले बाबत      तहसिलदार पेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाराचा दाखला    आवश्यक आहे.
  2. त्याचे वार्षिक उत्पन्न रू. 96,000/- पेक्षा जास्त ­ नसले     तहसिलदारपेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या महसूल           अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक आहे.
  3. 31निवड झालेल्या लाभार्थ्याने स्वहिस्स्याची रक्कम रु. 10,000/- गाव दत्तक असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्यात भरणे आवश्यक आहे.
  4. केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल बांधकाम संबंधी इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
  5. नैसर्गिक आपत्ती, अपंग परितक्त्या, घटस्फोटीत, माजी सैनिक व युध्दात विरगती प्राप्त झालेल्यांच्या कुटूंबाची प्राधायक्रमाने दारिद्रय रेषेवरिल कुटूंब असल्यास प्राधान्याने निवड करण्यात येते.
  6. सदर घरकुलाचे बांधकाम 269 चौ.फुट चटई क्षेत्राचे घरकुल बांधणे आवश्यक आहे. त्यामध्ये एक बहुउद्देशिय खोली व हानीचा समावेश असेल व शौचालयाची तरतूद भुखंडाच्या एका बाजुला घरकुलाच्या बाहेर बांधकाम करणे आवश्यक आहे.
  7. घरकुल बांधकाम करत असतां भुकंप प्रवणक्षेत्र असल्यास भुकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
  8. सदरचे घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यातर लाभार्थ्यांच्या कुटूंबा व्यतीरिक्त इतर कोणालाही वास्तव्य करता येणार नाही.
  9. त्याचप्रमाणे ज्या शहरांमध्ये अथवा शहरी समुहांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक लोकसंख्या समाजातील अन्य घटकांच्या तुलनेत अधिक आहे, अशांना राजीव आवास योजनेत प्राथमिकता दिली जाईल.
हे पण पहा --  New Gharkul Yadi : ग्रामपंचायत घरकुल याद्या जाहीर! घरकुल यादी मोबाईलवर कशी पाहायची?

Grampanchayat gharkul yojana

  • या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे प्राप्त झालेली प्रकरणे ग्रामसभेमध्ये ठेवून इच्छूक व आवश्यक त्या लाभार्थ्यांची 31निवड करण्यात येते.
  • ग्रामसभेद्वारे निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह पंचायत समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात.
  • पंचायत समिती स्तरावर सदरचे प्रस्ताव शासन निकषाप्रमाणे तपासून प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. नांदेड यांच्याकडे सादर करण्यात येतात.
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा अध्यक्ष जि. ग्रा.वि.यं. नांदेड यांच्याकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्या नंतर पात्र अर्ज प्रस्तावीत केलेल्या गावाच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात.
  • बँकांना प्राप्त कर्ज प्रकरणे प्राप्त झाल्या¬नंतर शोध अहवाल (Search Report) घेवून प्रकरण मंजुर केले जाते.
राजीव आवास योजनेचा उद्देश्य –

योजनेचा मुख्य उद्देश्य झोपडपट्टी, कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्की घरे उपलब्ध करून देणे आहे.
राजीव आवास योजनेचा उद्देश्य झोपडीत राहणाऱ्या समुहाला सशक्त बनवणे आणि विकासाच्या मुख्यधारेत त्यांचे योगदान निश्चित करणे. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

घरकुल योजना अनुदान

  • सदर योजनेत रु. 10,000/- लाभार्थी स्व:हिस्सा /श्रमदान स्वरुपात व बँक कर्ज रू. 90,000/- असे एकूण रु. 1,00,000/- लक्षचे घर राहणार आहे.
    पात्र लाभार्थीचे गाव ज्या राष्ट्रीयकृत बँकेच्या कार्यक्षेत्रात आहे. त्या बँकेत खाते उघडून रु. 10,000/- स्वत:च्या खात्यात भरावे.
  • बँकेमार्फत रु. 90,000/- कर्जाऊ रक्कमेवरील व्याजाची रक्कम भरण्याची हमी शासन (गृह31निर्माण) विभाग मार्फत संबंधित गृह 31निर्माण क्षेत्र विकास मंडळ, मुख्याधिकारी यांच्याकडून मिळते
  • संबंधित लाभधारकांना जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून व राष्ट्रीकृत बँकेकडून रु. 90,000/- पर्यंत घरकुल बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
  • याप्रमाणे बांधण्यात येणारे नवी घरकुल बँकेकडे तारण राहील. कर्ज वसुली संबंधीत जिल्हा परिषद व संबंधित बँक यांच्या समन्वयाने राहणार आहे. .
Rajiv Gandhi nivara yojana आवश्यक कागदपत्रे

१) जागेचा ७/१२ उतारा

२) मतदार ओळखपत्र

३) आधार कार्ड

४)रहिवाशी दाखला

५) उत्पन्नाचे शपथपत्र

६) पक्के घर नसल्याचे हमीपत्र

७) दिलेली माहीत खरी असल्याचे स्वयंघोषणापत्र/हमीपत्र

८) फोटो

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment