Close Visit Mhshetkari

Pokhara yojana : खूशखबर….पोखरी योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी आला

Pokhara yojana : पोखरा योजनेमध्ये अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे कारण की शेतकरी गट तसेच कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी अर्थसहाय्य साठी बाह्य व तसेच राज्य चा एकूण 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.पोखरा योजनेमध्ये अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.

पोखरा योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी मंजूर

शेतकरी गट तसेच कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी अर्थसहाय्य साठी बाह्य व तसेच राज्य चा एकूण 200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येईल.या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन अर्ज करायचे असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये लाभ मिळू शकतो

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत असून दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे पण पहा --  Good news दिवाळीचे मोठे गिफ्ट, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38% झाला | DA Hike updates

Pokhara yojana Maharashtra

या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता शासन निर्णयान्वये सन २०२२-२३ मध्ये एकूण रु.४२१.८६ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यापैकी रु.४०७.५६ कोटी एवढा निधी खर्ची पडलेला आहे. प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी शेतकरी गट कंपन्यांनी व ग्राम कृषि संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टकरिता बाहय हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.२०० कोटी निधी वितरणासाठी उपलब्ध झाला आहे.सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना

सन २०२२ – २३ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मुंबई यांना विविध बाबीची अंमलबजावणी करण्याकरिता ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टाखाली रु.२०० कोटी (रु. दोनशे कोटी फक्त) निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे पुढीलप्रमाणे वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment