Close Visit Mhshetkari

Land record : पोट खराब जमीन म्हणजे काय? पहा या जमिनीचे प्रकार उपयोग तोटे आणि सविस्तर माहिती..

Land record : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी शेतीविषयक माहिती घेऊन आलो आहे. भारत देशामध्ये बहुतांश उदरनिर्वाह शेतीवर चालतात.शेती हा शेतकऱ्याचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.

महाराष्ट्रामध्ये शेतीला अनुकूल असे हवामान व जमीन आहे पण त्यामध्ये सुद्धा काही लागवडीसाठी योग्य नाही आणि या क्षेत्रालाच आपण पोट खराब जमीन असे म्हणतो

पोट खराब जमीन म्हणजे काय?

पोट खराब जमिनीचे निराकरण करण्याकरिता सरकारने काही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल म्हणजे जमिनीच्या वापरावर ती निर्बंध व जमीन सुधारणा 2018 मध्ये सुरू केली, यामध्ये जमीन सुधारणेनुसार पोट खराब वर्ग खाली येणारी जमीन तुम्हाला कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल व त्या जमिनीचा वापर करून उत्पन्नात देखील वाढ मिळवता येईल.

पोटखराब जमिनीचे प्रकार 

पोटखराब वर्ग (अ) : सदरील जमिनीमध्ये खडकाळ क्षेत्र,नाले, खंतखाने इत्यादीचा समावेश असतो. ही जमीन पिक घेण्यासाठी निकामी असते. खडकाळ भाग असल्याने या जमिनीवर कोणतेही पीक किंवा शेतकऱ्यांना यामधून उत्पन्न काढता येत नाही जमिनीवर मसुलाकारणी केली जात नाही आणि अशा जमिनीला पोट खराब वर्ग अ असे म्हटले जाते.

पोट खराब वर्ग ब :   या प्रकारात सार्वजनिक कामाच्या वापरासाठी राखून ठेवलेली जमीन असते. रस्ता जमीन मान्यपद यासाठी जमीन तसेच पिण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी वापरण्यात येणारी, तलाव व ओढा यांनी व्यापलेली जमीन असते. कोणत्याही जाती जमाती कडून दोन घाण विल्हेवाट लावण्यासाठी वापरली जाणारी जमिनीचा समावेश या जमिनीमध्ये होतो.या जमिनीवर महसूल आकारणी केली जाते.

हे पण पहा --  Land Record : जमिनीचा खरा मालक कोण ? 5 मिनिटात पहा सविस्तर माहिती..

पोटखराब जमिनीचे फायदे तोटे

1) पोट खराब जमीन शेतकऱ्यांसाठी एक अडचणच आहे कारण या जमिनीचा वापर शेती करण्यासाठी होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते.

2) पोट खराब जमीन ही एक शेतकऱ्यांची साठी फायदा देखील आहे या जमिनीवर इतर प्रकारची उद्योगधंदे किंवा व्यवसाय सुरू करता येतील यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो

3) पोट खराब जमिनीचा वापर करण्यासाठी सरकारने काही योजना आखल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांना पोट खराब जमिनीचा वापर करून अधिक उत्पादन मिळवता येईल.

5) पोट खराब जमिनीचे नियोजन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. व यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे आणि देशाच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळेल व शेतकरी वर्ग विकसित व विकसनशील व प्रगत होईल.

आता आपला डिजिटल सातबारा उतारा येथे डाऊनलोड करा

Digital Satbara

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment