Government employees updates : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत.प्रलंबित विषयांवर हिवाळी अधिवेशनांमध्ये चर्चा चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील.
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष
केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी राज्य सरकारी बऱ्याच दिवसांपासून होत आहे.या बाबतीत देखील अधिवेशनांमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची दाटक्षशक्यता आहे.
महागाई भत्ता वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे माहे जुलै 2022 पासुन 38% DA वाढ hike) बाबतचा अधिकृत्त घोषणा निर्णय हिवाळी अधिवेशनांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतनासोबत प्रत्यक्ष रोखीने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येईल.
जुनी पेन्शन योजना
देशांमध्ये पंजाब,छत्तीसगढ,राजस्थान,झारखंड,बंगाल या पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द बंद करुन,जुनी पेन्शन योजना लागु केली आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरीता राज्यातील कर्मचाऱ्यांचा दि.19.12.2022 पासुनच नागपुर येथील अधिवेशनांवर धडक मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.