Goat Rearing Scheme : शेतीपूरक असे अनेकजोडधंदे आहेत .शेती सोबत यांत्रिक उद्योग तसेच पशुपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केले जातात दुग्ध व्यवसाय अशा प्रकारचे व्यवसाय शेतीपूरक शेतकरी करत असतात. व यामध्ये पशुपालनासोबत कुकूटपालन शेळीपालन या प्रकारचे बरेच व्यवसाय केले जात.
Goat Rearing Scheme Maharashtra
आपण शेळीपालन या व्यवसायाविषयी माहिती पाहणार आहोत .या व्यवसायाला किती खर्च लागतो. आणि कमीत कमी किती खर्च व किती जागा लागते. किती जागेमध्ये व किती खर्चामध्ये हा व्यवसाय आपल्याला उभारता येतो.
तरुण वर्ग पाहता बहुतांश शेळी पालन कुक्कुटपालन या व्यवसायाकडे वळलेला आपल्याला दिसून येत आहे.आताचा तरुण वर्ग हा सुशिक्षित असल्यामुळे शेतीपूरक असाच जोडधंद्याला वाव देताना आपल्याला दिसून येत आहे.
तसेच शेळी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून शासनाकडून आपल्याला विविध योजना राबवण्यात येतात याचा उपयोग शेतकरी वर्गांना व्हावा म्हणून शासन अनेक योजना राबवत असते. तसेच शेळीपालन या व्यवसायासाठी बँकेकडून आपल्याला 50 लाखापर्यंत कर्ज मिळवता येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या स्वरूप आणि गरजेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
तुम्ही मिळवलेले कर्ज त्याच्या व्याजावर देखील शासनाकडून तुम्हाला अनुदानाचा फायदा सबसिडीचा तुम्हाला मिळवता येतो. तसेच शेळीपालनामध्ये तुम्हाला कशा प्रकारे कर्ज उपलब्ध होईल हे आपण बघणार आहे.
नाबार्डच्या माध्यमातून देखील तुम्हाला शेळीपालनासाठी कर्ज उपलब्ध होते आणि अनुदानाचा देखील लाभ होतो नाबार्ड अंतर्गत शेळी पालन करण्याकरता अनुसूचित जाती जमाती आणि बीपीएल प्रवर्गातील लोकांना 50 टक्के सबसिडी मिळत आहे .व इतर प्रवर्गातील नागरिकांना 40% पर्यंत सबसिडीचा लाभ दिला जात आहे. नाबार्डच्या माध्यमातून 50 लाखापर्यंत अनुदानित चिता करण्यात आली आहे.
शेळीपालनासाठी कर्ज सुविधा
तुम्हाला शेळी पालन करण्यासाठी शेळी खरेदी करण्यासाठी तसेच त्यांच्या आहारासाठी लागणारा चारा आणि त्यांना राहण्यासाठी लागणारे शेड तसेच खाद्य तयार करण्यासाठी बांधकामासाठी देखील तुम्हाला बँक कर्ज देते
शकता नाबार्ड योजना अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक व्यावसायिक बँक तसेच नागरी बँक आणि राज्य सहकारी कृषी इत्यादी माध्यमातून तुम्हाला शेळी पालन शेळी पालन करण्यासाठी कर्ज मिळते
शेळीपालनाकरिता वेगवेगळ्या बँका त्यांच्या निकषानुसार ग्राहकांना विहित नियमानुसार ठराविक रकमेचे कर्ज देत असतात. यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर आयडीबीआय बँकेकडून शेळीपालन करिता 50 हजारापासून ते 50 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा मिळते.
आवश्यक कागदपत्रे
याकरिता अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो, सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट तसेच पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बीपीएल कार्ड असल्यास जात प्रवर्गाकरिता जातीचे प्रमाणपत्र, वय अधीवास प्रमाणपत्र, शेळीपालन व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जमीन नोंदणी दस्तऐवज इत्यादी कागदपत्रे लागतात.
तुम्ही कुठे अर्ज करू शकता?
शेळीपालन योजनेच्या शेळीपालन योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज घ्यावा लागतो. व तो अर्ज भरताना तुम्हाला विचारलेल्या माहिती सविस्तर लिहावी लागते.