Close Visit Mhshetkari

Construction Home Loan : कन्स्ट्रक्शन होमलोन व होमलोन मध्ये काय फरक आहे? घ्या जाणून सविस्तर माहिती..

Construction Home Loan: नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला असे वाटत असते. की आपले एक स्वतःचे घर असावे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यास करिता प्रत्येक जण कर्ज घेत असतो. आणि कर्ज घेऊनच त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

घर खरेदी करण्यासाठी आपण बँकेच्या माध्यमातून सहजपणे होम लोन घेऊ शकतो? होम लोन विचार आपण रेडी टू मूवी म्हणजेच एखादं कर व फ्लॅट खरेदी करतो त्याकरिता आपण होम लोन घेण्याचा विचार करत असतो.

कन्स्ट्रक्शन होम लोन व होम लोन मधील काय फरक असतो ?स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्यासाठी होम लोन कसे घ्यावे?

कन्स्ट्रक्शन होम लोन म्हणजे काय?

स्वतःच्या जागेवरती घर बांधण्यासाठी आपल्याला होम लोन मिळू शकते. का व कशा प्रकारे मिळेल आणि त्यासाठी कुठल्या अटी व शर्ती असेल हे आपल्याला माहीत असणे आवश्यक असते.

आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या शहरांमध्ये प्लॉट खरेदी केले जातात व त्यावर घर बांधले जाते. तुम्ही जर यावर मिळत असलेल्या कर्ज सविस्तर केला तर स्वतःच्या जमिनीवर घर बांधताना कर्ज घेण्याची काही प्रक्रिया ही थोडी किचकट प्रकारची आहे.

हे पण पहा --  Home loan Interest : RBI च्या एका निर्णयामुळे Home Loan चा EMI वाढणार ? लवकरच होणार घोषणा

शहरामध्ये फ्लॅट खरेदी करणे व त्यावरती गृह कर्ज घेणे सोपे आहे परंतु स्वतःच्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी बँका बांधकाम पुरव कर्ज देत असतात. व त्यालाच आपण कन्स्ट्रक्शन होम लोन असे म्हणतो. आपण फ्लॅटसाठी जे काही गृह कर्ज घेत असतो. हे पैसे थेट बिल्डरला जाते आणि होम लोन मध्ये कर्जाचे पैसे हे संबंधित जागा मालकाकडे जातात.

कन्स्ट्रक्शन होमलोन आणि होमलोन मधील फरक

होमलोन

  1. पूर्ण झालेल्या घराची खरेदी करण्यासाठी वापरले जाते.
  2. कर्जाची रक्कम घराच्या बाजारभावावर आधारित असते.
  3. कर्जाचा व्याज दर तुलनेने कमी असतो.
  4. कर्जदाराची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता आणि क्रेडिट स्कोअर यावर आधारित कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.

कन्स्ट्रक्शन होमलोन:

  1. स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्यासाठी वापरले जाते.
  2. कर्जाची रक्कम टप्प्याटप्प्याने घर बांधणीच्या प्रगतीनुसार दिली जाते.
  3. कर्जाचा व्याज दर होमलोनपेक्षा जास्त असतो.
  4. कर्जदाराची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता, क्रेडिट स्कोअर आणि बांधकामाचा अंदाजपत्रक यावर आधारित कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.

Leave a Comment