Close Visit Mhshetkari

Green Fixed Deposit : बँक ऑफ बडोदाने लाँच केली “ग्रीन अर्थ डिपॉझिट स्कीम” ! मिळणार ‘इतके’ व्याज

Green Fixed Deposit : मित्रांनो नमस्कार आपल्याला माहित असेल की सध्याच्या युगात सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर निवृत्ती धारक सुद्धा वेगवेगळ्या बचत योजनेच्या शोधात असतात सामान्य नागरिक सुद्धा सुरक्षित बचतीचे पर्याय शोधत असतात अशाच वेळी आपण एका विशेष एफ डी विषयी माहिती बघणार आहोत जिथे नाव आहे ” ग्रीन अर्थ डिपॉझिट स्कीम”

BOB Earth Green Term Deposit

बँक ऑफ बडोदा ने आपल्या ग्राहकांसाठी खास एफडी योजना आणली आहे.बँकेच्या विशेष एफडीचे नाव अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट स्कीम आहे. बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या बँक एफडी चा उद्देश पैसे उभारणे हा आहे.पैसा पर्यावरण पूरक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून सदरील योजनेच्या माध्यमातून पैसा उभारला जातो. विशेष बाब म्हणजे बँक ऑफ बडोदा या विशेष एफडीवर 7.15 टक्के वार्षिक व्याज देत आहे.

भारतीय रहिवासी तसेच NRI आणि HNI गुंतवणूकदार बँक ऑफ बडोदा अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र आहेत.बँक ऑफ बडोदाचे विद्यमान आणि नवीन ग्राहक बँकेच्या भारतभरातील कोणत्याही शाखेतून ग्रीन डिपॉझिट उघडू शकणार आहेत.

हे पण पहा --  FD Interest Rates : खुशखबर ! 'या' 4 बँका देत आहेत एफडीवर 9 % व्याज; पहा संपूर्ण यादी ...

असे गुंतवा योजनेत पैसे

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ देबदत्त चंद म्हणाले की, बॉब अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजना सुरू केल्याने ठेवीदारांना स्थिर आणि सुरक्षित आर्थिक परतावा मिळण्याचा दुहेरी फायदा होईल.

ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेद्वारे जमा केलेले पैसे हरित प्रकल्प,किंवा अक्षय ऊर्जा स्वच्छ वाहतूक, शाश्वत पाणी योजना, कचरा व्यवस्थापन अशा पर्यावरण पूरक प्रकल्पामध्ये ठराविक कालावधीसाठी गुंतवले जातात ज्याद्वारे नवनवीन योजनांना चालना मिळते.

Green FD internet rate

बँक ऑफ बडोदा मार्फत चालवण्यात येणाऱ्या या अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेत किमान 5 हजार रुपये ते कमाल 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. बडोदा बँकेकडून ग्राहकांना 6.40 टक्के ते कमाल 7.15 टक्के व्याज दर देण्यात येत आहे.

मुदत – व्याजदर

  • 1 वर्ष – 6.75 टक्के
  • 1.5 वर्षे – 6.75 टक्के
  • 777 दिवस – 7.15 टक्के
  • 1111 दिवस – 6.40 टक्के
  • 1717 दिवस – 6.40 टक्के

Leave a Comment