Lok Sabha Election : मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला. असून लोकसभा निवडणूक 7 टप्प्यामध्ये होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली असून या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
Lok Sabha Elections 2024
आचारसंहिता लागू झाली असून आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टीचे पालन करावे. एका उमेदवाराला लोकसभे निवडणुकीत किती खर्च करता येईल . आचारसंहितेचे 10 नियम कोणते आहेत ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच ओडीसा सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या देखील तारखा घोषित करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली. असून देशभरामध्ये स्वतंत्र व निपक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम लागू केले आहे, याच नियमांना आपण आचारसंहिता असे या नियमांचे काटेकोर पालन करणे. सरकार तसेच नेतेमंडळी व राजकीय पक्षांना बंधनकारक राहते.
आचारसंहिते मधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?
- निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका करू नये
- धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत.
- कोणत्याही उमेदवाराला मतदारांना धमकावता येणार नाही.
- प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
- नियमांच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल.
- उमेदवाराला धर्म, जात, पंथ याआधारे मतदान मागता येणार नाही.
- तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करता येणार नाही.
- निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- प्रचारात लहान मुलांचा वापर झाला तर आम्ही कडक कारवाई करू शकतो.
- अफवा,फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही.