Business Loan : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात. यापैकी 50% अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे.व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजनालाभदायी ठरत आहेत. या योजनेविषयीची माहिती पाहूयात.
व्यवसाय कर्ज योजना | Business Loan
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू.50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मिळू शकते.
महामंडळ प्रकल्प गुंतवणुकीच्या 20 टक्के बीज कर्ज म्हणून द.सा.द.शे.4 टक्के व्याजदराने देते व या अर्थसहाय्यापैकी रू.10,000/- रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते.
रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कर्जाच्या रकमेपैकी जास्तीत जास्त 10 हजार रुपये पर्यंत 50 % रक्कम महामंडळाकडून सबसिडी म्हणून दिली जाते. उर्वरित 50 % कर्जाची परतफेड 36 ते 60 महिन्याच्या समान हफ्त्यांत किंवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यात करावी लागते.
व्यवसाय कर्ज पात्रता ?
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
- अर्जदाराच्या वयाची 18 ते 50 वर्षे अशी आहे. अर्जदारास निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे.
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- जातीचा दाखला
- कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- प्रमाणपत्र,
- रेशन कार्ड
- अनुभवाचा दाखला.
- ग्रामपंचायत व तत्सम शासकीय कार्यालयांचे ना हरकत
अर्ज करा करावा ?
या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हयातील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधावा.