PF Link with Bank Account : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमचा काही पगाराचा भाग हा पीएफ मध्ये जमा केला जातो. ईपीएफ खात्यातील पैशावर सरकार दरवर्षी ठराविक व्याज देते.
सध्या हा व्याजदर 8.25 टक्के एवढा आहे नोकरी करणारे कर्मचारी निवृत्तीनंतर दहा पीएफ खात्यात पैसे जमा करून मोठा निधी तयार करू शकतात. परंतु तुम्हाला हे पैसे निवृत्तीनंतर मिळतात. परंतु यातील काही रक्कम तुम्ही नोकरी करत असताना देखील काढू शकता.
बँक खाते पीएफ खाते लिंक आवश्यकता
ईपीएफओ साइटवर आपले बँक खाते अपडेट करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे, तुम्हाला काम करत असताना आणि निवृत्तीनंतरही तुमचे पीएफ पैसे थेट बँक खात्यात जमा होतील.
ईपीएफओ साइटवर तुमचे बँक खाते अपडेट करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय पैसे मिळू शकतील.
तुमचे बँक खाते ईपीएफओ असे जोडा
- पीएफओ पोर्टलवर भेट द्या: https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
- तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- ‘Manage’ टॅबवर क्लिक करा.
- ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘KYC’ निवडा.
- ‘Bank Account’ पर्याय निवडा.
- तुमच्या बँकेचे नाव, IFSC कोड आणि बँक खाते क्रमांक टाका.
- ‘Save’ बटणावर क्लिक करा.
- तुमचे बँक खाते अपडेट करण्याची विनंती तुमच्या नियोक्ताकडे पाठविली जाईल.
- तुमच्या नियोक्ता या विनंतीला मंजूरी दिल्यानंतर तुमचे बँक खाते ईपीएफओशी लिंक केले जाते.
तुम्ही तुमचे बँक खाते अपडेट केले आहे का तपासा
1. ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करा.
2. ‘Member Interface’ वर क्लिक करा.
3. ‘View KYC’ वर क्लिक करा.
4. तुमचे बँक खाते तपशील ‘Bank Account’ विभागात दर्शविले जातील.
PF Account With Bank Account
- ईपीएफओच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा: 1800-110-0055
- ईपीएफओच्या कार्यालयाला भेट द्या.
- ईपीएफओच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ‘Grievance Redressal’ वापर करा.
सूचना : तुम्ही तुमचे बँक खाते त्वरित अपडेट करा जेणेकरून तुम्हाला तुमचे पीएफ पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये.