Cotton Purchase : सन 2023-24 च्या कापूस हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 2.50 लाख गाठी (1 गाठ = 170 किलो) कापूस खरेदी केला आहे.शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतींच्या दराने यासाठी 900 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाने (CCI) जाहीर केली आहे.
कापूस बाजार भाव अपडेटस्
भारतीय कापूस महामंडळ म्हणजे सीसीआय म्हटले आहे की यावर्षीचा कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यात सरकारी खरेदी सुरू झाले असून खरेदीसाठी सरकारने 900 कोटी रुपये महामंडळाला दिले असून थोडक्यात 900 कोटी रुपयाचा कापूस सरकारने खरेदी केला आहे.
भारतातील कापूस उत्पादक महत्त्वाच्या राज्यांपैकी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीद्वारे हा कापूस खरेदीची सुरुवात करण्यात आली आहे.
शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने यावर्षी उच्च प्रतीच्या कापसासाठी 7020 रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव जाहीर केलेला आहे. तसेच मध्यम प्रतीच्या कापसासाठी 6620 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित करण्यात आली आहे.
MCX Cotton market live
सरकारने कापूस खरेदी संदर्भात नवीन प्रणाली विकसित केलेली असून शेतकऱ्यांनी CCI केंद्रावर हमी दरावर कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याचा कापूस हा काट्यावर लावला जाईल व १५ दिवसांत पैसे खात्यात जमा होईल.