Close Visit Mhshetkari

Credit Card : क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान

Credit Card : आजकालच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे बरेच वेळी आपण क्रेडिट कार्ड बँकेकडून घेतो परंतु त्याचा वापर भीतीपोटी किंवा अन्यकारणाने करत नाही.

मात्र अशावेळी आपल्याला मोठा आर्थिक फर्जंड बसू शकतो शिवाय आपल्याला इतर अडचणीचा सुद्धा सामना करावा लागू शकतो तर बघूया तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील आणि ते वापरात नसतील तर, काय घडू शकतं.

Credit card new rules

क्रेडिट स्कोअर :- मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कोणत्याही वित्तीय संस्थेकडून किंवा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला क्रेडिट स्कोर ची आवश्यकता असते. अशा वेळेस जेव्हा आपण एखाद्या क्रेडिट कार्ड घेतो. तेव्हा आपल्या सिबिल फोर मध्ये क्रेडिट कार्डची इंट्री होते आणि या ठिकाणी आपल्या नावावर क्रेडिट कार्डचे जेवढी मर्यादा असते तेवढे कर्ज दाखवण्यात येते. त्यामुळे आपोआपच आपली कर्ज घेण्याची मर्यादा कमी होते तेव्हा क्रेडिट कार्ड घेताना या गोष्टीचा विचार करावा.

जर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारायचा असेल तर यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे नियमित पेमेंट केल्यास आणि वेळेवर बिल भरल्यास, तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल.

जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि ते वापरत नसेल, तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो आणि क्रेडिट स्कोअरमध्ये थोडीशी घसरण होऊ शकते.

हे पण पहा --  Free CIBIL check : आपला क्रेडिट स्कोअर 2 मिनिटात मोफत कसा चेक करायचा ? येथे पहा डायरेक्ट लिंक 

निष्क्रियता शुल्क :- बऱ्याच कंपन्या अशा आहेत की त्या क्रेडिट कार्डवर निष्क्रियता शुल्क म्हणजे क्रेडिट कार्ड वापरत नसला तर दंड लावतात.जर तुमचे कार्ड या श्रेणीत येत असेल, तर नक्कीच आपल्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो.

वार्षिक शुल्क :- मित्रांनो क्रेडिट कार्ड घेताना आपल्याला माहिती असेल की जेव्हा बँक किंवा इतर संस्था आपल्याला क्रेडिट कार्ड तेथे तेव्हा त्याचे वार्षिक शुल्क सुद्धा सांगते बऱ्याच कंपन्या लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड देतात परंतु बहुतांश बँका वार्षिक शुल्क आकारतात.

Credit card apply

त्यामुळे आपण जरी क्रेडिट कार्डचा वापर केलेला नसला तरी आपल्याला वार्षिक शुल्क भरावे लागतेच म्हणजे विनाकारण आपल्याला हा आर्थिक भूर्जंड सहन करावा लागू शकतो.

रिवॉर्ड आणि डिस्काउंट :- जर आपल्याला आपल्या क्रेडिट कार्डचा वापरा बद्दल रिव्हर्स मिळाले असतील किंवा तुम्हाला कोणत्या ऑफर अंतर्गत काही सूट मिळालेली असेल तर आपण क्रेडिट कार्डचा वापर न केल्यामुळे हे रिव्हर्स पाच होतात किंवा ऑफर बंद होतात. 

Leave a Comment