Close Visit Mhshetkari

Pre-Matric Scholarship :  विद्यार्थांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया सुरू; ३० हजार रुपये मिळणार

Pre-Matric Scholarship :- नमस्कार मित्रांनो राज्यातील तसेच देशातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची गोष्ट समोर आली असून,देशातील दिव्यांग मुलांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना अर्ज भरणे सुरू झालेले आहेत.त्यासाठी आवश्यक पात्रता कागदपत्र शेवटची दिनांक त्यांची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

National scholarship Scheme

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल योजना करण्यात आले असून इयत्ता नववी आणि दहावी मध्ये राष्ट्रीय स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे . दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत सगळे अर्ज विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने भरवायचा आहे.

राष्ट्रीय स्कॉलरशिप पोर्टल वरील सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे फ्री बॅटरी योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित कालावधी ऑनलाईन भरावे असे आवाहन शिक्षक संस्थानालय योजना डॉक्टर महेश पालकर यांनी केले आहे.

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पात्रता निकष

  • अनुदानित शाळांतील इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विध्यार्थी 
  • विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा जास्त असावे.
  • सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र
  • शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील.
  • पालक वार्षिक उत्पन्न दोन लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे
हे पण पहा --  HDFC Scholarship : एचडीएफसी बँकेमार्फत १ ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीची रक्कम :- विद्यार्थांसाठी असलेली वार्षिक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ९ हजार ते १४ हजार ६०० रुपये इतकी आहे.

प्रि- मॅट्रीक राष्ट्रीय शिष्यवृत्ती नोंदणी व अर्ज  वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर
  • शाळास्तरावरील अर्ज पडताळणी अंतिम तारीख : १५ डिसेंबर
  • जिल्हा स्तर अर्ज पडताळणी मुदत : ३० डिसेंबर
  • अधिक माहितीसाठी संकेतस्थळ – www.scholarships.gov.in
  • www.depwd.gov.in.

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्ज येथे करा

National scholarship

Leave a Comment