Close Visit Mhshetkari

MCX cotton soyabean live : नवीन कापूस, सोयाबीन मिळतोय चांगला भाव; पहा नवीन दर

MCX cotton live : कापसाला मुहूर्ताचा भाव बारा हजार रुपये मिळाला होता. भाव वाढणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. यंदा नवीन कापूस निघाला आहे. त्याला खासगी व्यापाऱ्यांकडून अवघा साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

MCX cotton Market live

कापसाचा नवा हंगाम तोंडावर असताना उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु झाली आहे.उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या कपसाच्या लिलावाचा शुभारंभ झाला. पण खरी आवक सुरु झाली ती पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये. या तीन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाचे व्यवहार पार पडत आहे.

कापूस व्यापाऱ्यांनी ना मुहूर्त काढता न भाव काढता सरळ कापसाची खरेदी सुरू केली आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे एकरी दोन-तीन क्विंटल कापूस येण्याची शक्यता आहे. यातच व्यापारी कापूसही साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत.

MCX soyabean Live

आज दिनांक ७ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीने लिलाव झाले. लातूर बाजारपेठेत आज सोयाबीन पोटलीचा भाव ४६०० रुपये असा होता.

हिंगोली बाजारपेठेत सोयाबीनला सरासरी ४३७५ असा भाव मिळाला. भोकरदनच्या बाजारपेठेत आज सोयाबीनने चांगलाच भाव खाल्याचे दिसून आले. आज या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची १४ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४८०० रुपये, जास्तीत जास्त ५ हजार रुपये, तर सरासरी ४९०० रुपये प्रति क्विंटल असे होते.

हे पण पहा --  MCX Cotton Market : चिंता मिटेना,प्रश्न सुटेना,कापूस बाजार वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस घरातच

कापूस बाजार भाव

  • 06/10/2023 – खामगाव – मध्यम स्टेपल – क्विंटल 33 – 6600 – 7200 – 6900
  • 05/10/2023 – आर्वी – एच-४ – मध्यम स्टेपल – क्विंटल 535 – 7350 7400 – 7370
सोयाबीन बाजार भाव
  • बाजारपेठ – आवक – किमान दर – कमाल दर – सरासरी भाव 
  • जळगाव – मसावत — क्विंटल 28 – 3900 – 3900 – 3900
  • अमरावती लोकल क्विंटल 3378 4400 4576 4488
  • हिंगोली लोकल क्विंटल 505 – 4180 – 4570 – 4375
  • चोपडा पांढरा क्विंटल 350 – 3001 – 4426 – 4152
  • अकोला पिवळा क्विंटल 1540 – 4100 – 4470 – 4400
  • चिखली पिवळा क्विंटल 356 – 4200 – 4500 – 4350
  • पैठण पिवळा क्विंटल 4 – 3920 – 3920 – 3920
  • भोकरदन पिवळा क्विंटल 14 — 5000 — 4900
  • भोकर पिवळा क्विंटल 3 – 4225 – 4445 – 4335
  • मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 600 4280 – 4495 – 4330
  • परतूर पिवळा क्विंटल 178 – 4500 – 4620 – 4600
  • औराद शहाजानी पिवळा क्विंटल 231 – 4560 – 4688 – 4624
  • चांदूर-रल्वे. पिवळा क्विंटल 135 – 4000 – 4500 – 4300
  • आष्टी-जालना पिवळा क्विंटल 44 – 4180 – 4500 – 4400

2 thoughts on “MCX cotton soyabean live : नवीन कापूस, सोयाबीन मिळतोय चांगला भाव; पहा नवीन दर”

Leave a Comment