Close Visit Mhshetkari

IMD Weather : महाराष्ट्रात 48 तासांत या भागात पुन्हा होणार दमदार आगमन; या जिल्ह्यांना मिळणार दिलासा…

IMD Weather : जून जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ केल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे जोरदार कमबॅक झाले झाल्याचे आपण पाहिले होते.

महाराष्ट्र हवामान अंदाज

आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत अशावेळी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी समोर आली असून पावसात पुन्हा पाऊस केव्हा सुरू होईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तर याबाबत आनंदाची बातमी समोर आलेली असून बघूया सविस्तर माहिती

भारतीय हवामान खात्याने भारतातील जवळपास 15 राज्यांमध्ये 20 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांना मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Weather forecast updates

सध्यस्थितीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशामधून मान्सून सक्रिय होत असल्याने हरियाणा, पंजाब, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पूर्व भागात पाऊस पडत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.दिनांक 22 ते 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर पर्यंत आणि शेवटी पाच ऑक्टोबरच्या कालावधीत सरासरी पाऊस पडणार आहे.

हे पण पहा --  Maharashtra Rain : पावसाचा मुक्काम वाढला; राज्यात पुढील काही दिवसात संततधार

Leave a Comment