Jyeshtha Gauri Puja : भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलचाराप्रमाणे महालक्ष्मीची पूजा व स्थापना केली जाते.गौरी पूजन हे भाद्रपद महिन्यातील सर्व स्त्रियांचे महत्त्वाचे व्रत आहे आपल्या महाराष्ट्रात एक सण म्हणून हे व्रत साजरे केले जाते यालाच गौरी महालक्ष्मी पूजन म्हणतात.
Jyeshtha gauri |
ज्येष्ठा गौरी शूभमुहूर्त
संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचा तीन दिवस (Jyeshtha Gauri Puja चालणारा उत्सव साजरा केला जाणारा सण आहे. यालाच गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते.अखंड सौभाग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ज्येष्ठा गौरी उत्सव साजरा (महालक्ष्मी आगमन) केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमण,दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.यावर्षी ‘ज्येष्ठा गौरी शूभमुहूर्त
>> ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त : सकाळी 06:00 ते संध्याकाळी 06:39 पर्यंत
>> ज्येष्ठा गौरी पूजन कालावधी: 12 तास 39 मिनिटे
>> ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त : सकाळी 06:01 ते 06:38 पर्यंत
>> ज्येष्ठा गौरी विसर्जन कालावधी: 12 तास 37 मिनिटे
ज्येष्ठा गौरी पुजा विधी (Jyeshtha Gauri Puja Vidhi)
ज्येष्ठा गौरी सण हा तीन दिवस चालणारा उत्सव असून विवाहित महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात.पहिल्या दिवशी ज्येष्ठा गौरी आवाहन असते म्हणजे या दिवशी शुभ मुहूर्तावर माता गौरीची स्थापना केली जाते.या उत्सवाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून सडा,रांगोळी करून शुभ मुहूर्तावर माता गौरीची स्थापना केली जाते.(ज्येष्ठा गौरी पुजा विधी
ज्येष्ठा गौरींसाठी सुंदर मखर सजवले जाते आणि गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात.त्यासाठी विविध मखर,लाईटिंग,पताका,फुले,खेळणी इत्यादी चा वापर करून सजावट केली जाते.पाच किंवा सात धान्यांच्या राशी मांडल्या जातात.
ज्येष्ठा गौरी पूजन (Jyeshtha Gauri pujan)
दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते.यादिवशी गौरींसाठी विविध प्रकारच्या अन्नांचा नैव्यद्य बनवला जातोजातो.गौरायांना शिदोरी बनवली जाते.माता गौरीला 16 भाज्या,16 कोशिंबीर, 16 चटण्या,16 पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.यानंतर 16 दिव्यांची आरती करून ज्येष्ठा गौरी पूजन (Jyeshtha Gauri pujan) केले जाते.तिसऱ्या दिवशी गौरायांना निरोप देऊन त्यांचे विसर्जन करण्यात येते.
ज्येष्ठा गौरी कथा (Jyeshtha Gauri kahani)
धर्म शास्त्रात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहेत. एकदा अस्वरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरी महालक्ष्मी कडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी त्याची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने अस्वरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतीला व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरी ची पूजा करू लागल्या.
टिप :- रील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.