Close Visit Mhshetkari

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठवा वेतन आयोगसंदर्भात हालचाली

8th Pay Commission : सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या महागाई भत्याची चर्चा रंगली असताना आता 8 व्या वेतन आयोगाच्या चर्चांना उधाण आले आहे.

8th Pay Commission News

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स साठी आनंदाची बातमी असून येत्या होळीपुर्वीच यांना चांगली बातमी मिळू शकते.सातव्या वेतन आयोग  नंतर आठवा वेतन आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.यामुळे पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 44% वाढ होणार अशी शक्यता आहे.कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मध्ये वाढीचा निर्णय काही दिवसांत होणार आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की संदर्भात लवकरच एक निवेदन तयार करून सरकारच्या स्वाधीन करणार आहे.पण दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री राज्य पंकज चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 8 व्या वेतन आयोगाची सुरूवात करण्यास सरकारचा कोणता विचार नाही.

अशातच युनियनचे म्हणणे आहे की त्यांच्या शिफारशीनुसार पगार वाढवण्याची किंवा ‘आठवा वेतन आयोग आणण्याची मागणी करण्यासाठीही संप केला जाऊ शकतो.

8 वा वेतन आयोगाला मुहुर्त कधी ?

आठव्या वेतन आयोगाला मुहुर्त कधी लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण करुयात. विविध तज्ज्ञ त्यांचे तर्क लढवत आहेत.पण 2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यावेळी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु शकते.

निवडणुकांमध्ये आठवा वेतन आयोग घोषित करुन पुढील दोन वर्षांत या विषयीची अंमलबजावणीचा प्रयत्न सरकार करेल असाही दुसरा मतप्रवाह आहे. सध्याचे वातावरण पाहता सरकार कर्मचारी संघटनाचा नाहक रोष ओढावून घेण्याच्या मनस्थितीत नसणार हे निश्चित आहे.त्यामुळे निवडणुकांच्या जवळपास ही घोषणा होऊ शकते.

हे पण पहा --  7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या DA बाबत खुशखबर.. जाणून घ्या तारीख, पगारवाढ व इतर तपशील!

8th Pay Commission update

8 व्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार ?

सातवा वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आलाआला होता. म्हणजे 1 मार्च 2016 रोजी असलेल्या मुळ पगाराला 2.57 गुणले आणि वेतन आणि त्याआधारे त्याआधारे सातवा वेतन आयोग लागू करुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली.सर्वात कमी मुळ पगार 18000 रुपये करण्यात आला होता.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना महागाई भत्ता, प्रवास भत्ता,घरभाडे या भत्त्याचा विचार न करता फक्त मुळ वेतनावर सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 ने गुणाकार काढून काढला जातो.

Leave a Comment