Close Visit Mhshetkari

Cluster primary school : मोठी बातमी… जिल्हा परिषदेच्या नवीन केंद्रीय शाळांची स्थापना होणार! पहा नवीन शासन निर्णय व निकष

Cluster primary school : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिक्षण विभाग संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.आता नवीन केंद्रीय शाळा व केंद्र प्रमुख निर्मिती केली जाणार आहे.पाहूया सविस्तर माहिती

Cluster primary school new update

शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,दिनांक 14.9.1994 च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुख व केंद्र शाळांची निर्मिती झाली होती.

जिल्हा परिषदातील प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाची सूक्ष्म नियोजन,सतत उपस्थिती टिकवणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी एकूण 4860 केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्या आहेत

.सदरची केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या 11 प्राथमिक शाळाकरिता 1 याप्रमाणात निश्चित करण्यात आलेली आहे.

केंद्रीय शाळा व केंद्र प्रमुख निर्मिती महाराष्ट्र

सद्यस्थितीत नविन शाळा मंजूर झालेल्या आहेत.त्यामुळे सदर मंजूर केलेली केंद्रसमूहाची संरचना सुधारित करणे आवश्यक असलेबाबत मा.प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांनी दिलेल्या दिनांक 01/02/2023 अन्वये निर्देश दिलेले आहेत.

हे पण पहा --  Cluster Head : केंद्रप्रमुखांची रिक्त पदेलवकरच भरणार,पहा पात्रता,निकष परिक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

Cluster system for primary schools

सद्यस्थितीत मंजूर असलेल्या पदांमध्ये समान शाळा वाटप व भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन केंद्रसमूहाची सुधारित संरचना करण्यात येणार आहे.

मा.मुख्यकार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद यांना सुधारित संरचनांचा केंद्रनिहाय प्रारूप आरखडा तयार करुन दिनांक 10.02.2023 पर्यंत केंद्रसमूहाची सुधारित संरचनेचा प्रत्येक केंद्रास जोडण्यात आलेल्या शाळांच्या नावासह प्रस्ताव संचालनालयास सादर करावा.

Leave a Comment