Close Visit Mhshetkari

Free Flour Mill मोफत पीठ गिरणी योजना शासन निर्णय व अर्ज नमुना

Free Flour Mill Scheme : भारतातील महिलांना सारखे शेतातच काम करावे लागत असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारने ही नवीन योजना  चालू केली आहे जेणे करून या योजनेच्या अंतर्गत महिलांना रोजगार मिळेल.

मोफत पीठ गिरणी योजना

सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महारष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सुध्दा महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी (Women and Child Welfare) महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली असते.

 राज्यातील महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम काम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाचे 10 % निधीतून मोफत पिठाची गिरणी योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.सरकार महिलांना “मोफत पीठ गिरणी योजना 2022” अंतर्गत मोफत पिठाची गिरणी देणार आहे असून योजने अंतर्गत महिलांना 100% टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे.

Free Flour Mill Scheme

मुख्य उद्देश देशातील ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्यांना जिल्हा परिषदेकडून मोफत पिठाची गिरणी देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून देता येईल आणि त्यांना घरबसल्या काम करून चांगले उत्पन्न मिळवता येईल म्हणून सरकारच्या या योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे.

हे पण पहा --  ZP Yojana : खुशखबर..जिल्हा परिषद मार्फत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू! पहा पात्रता,कागदपत्रे आणि लगेच येथे करा अर्ज

मोफत पिठाची गिरणी योजना पात्रता

1) मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.

2) लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

3) मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.

4) मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

(18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांनालाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न(yearly income) हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा (तहसीलदार कडून किंवा तलाठी)

मोफत पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे

>> आधार कार्ड झेरॉक्स

>> घराचा ८ अ उतारा

>> उत्त्पन्न दाखला

>> बँक पासबुक

>> लाईट बिल झेरॉक्स

>> ईमेल आयडी

>> पिठाची गिरणी ठेवण्यासाठीच्या जागेचे दोन फोटो झेरॉक्स

मोफत पिठाची गिरणी योजना नियम अटी व शर्ती

•• मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

•• लाभार्य्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून होणारे सर्व वार्षिक उत्पन्न दिड लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

Leave a Comment